Join us  

IDBI Bank Privatisation: 15 दिवसानंतर 'या' सरकारी बँकेची होणार विक्री; सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 1:50 PM

IDBI Bank : बँकेच्या खासगीकरणासाठी सरकारने तयारी पूर्ण केली आहे.

IDBI Bank Privatisation Update: गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने अनेक बँकांचे खासगीकरण केले आहे. यातच आता बँकांच्या खाजगीकरणाबाबत सरकारकडून मोठा बदल करण्यात येत आहे. अलीकडेच, सरकारने IDBI बँकेच्या खाजगीकरणासाठी प्रारंभिक बोली भरण्याची अंतिम मुदत वाढवली होती. यानंतर आता आणखी एक मोठे अपडेट समोर येत आहे.

बोली वाढण्याची शक्यताआयडीबीआय बँकेच्या खरेदीदारांना करात सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. करात सवलत देऊन, अधिकाधिक खरेदीदारांना बोलीसाठी आकर्षित करण्याचा सरकारचा विचार आहे. अधिक बोलीदार दिसू लागल्याने बँकेची बोली वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे निर्णय घेतलायामुळे आता आयडीबीआय बँकेच्या खरेदीदारांना अंतिम बोलीनंतर शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीवर अतिरिक्त कर भरण्यापासून दिलासा मिळेल. बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आर्थिक बोली अंतिम झाल्यानंतर बँकेच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली असेल, तर खरेदीदाराला किमतीच्या वाढीवर कर भरण्यास सांगणे चुकीचे ठरेल. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

60.72 टक्के हिस्सा विकण्याची योजना आयडीबीआय बँकेत सरकार आणि एलआयसीचा 95 टक्के हिस्सा आहे. सरकार आणि एलआयसीला 60.72 टक्के हिस्सा विकायचा आहे. यापूर्वी, संभाव्य खरेदीदारांकडून बोली मागवण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर होती. मात्र अलीकडेच केंद्राने बँकेच्या खाजगीकरणासाठी प्रारंभिक निविदा भरण्याची अंतिम मुदत 7 जानेवारीपर्यंत वाढवली होती. 

टॅग्स :बँकनिर्मला सीतारामनकेंद्र सरकार