ICL Fincorp : आयसीएल फिनकॉर्प या नामांकित नॉन-बैंकिंग फायनान्शिअल कंपनीने बिहारमध्ये आपली पाळेमुळे घट्ट करत पाटणा येथे नवीन प्रादेशिक कार्यालय आणि तीन नवीन शाखांचे उद्घाटन केले आहे. नवीन प्रादेशिक कार्यालय ओल्ड बायपास रोड, राजेंद्र नगर टर्मिनल समोर, कंकडबाग, चित्रगुप्त नगर, पाटणा येथे स्थित आहे. यासोबतच राजेंद्र नगर, मैनपुरा आणि दानापुर येथे तीन नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत. या विस्तारामुळे ICL Fincorp च्या वित्तीय सेवांची व्याप्ती वाढणार असून ग्राहकांना उत्तम सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
भव्य उद्घाटन सोहळाया विस्ताराचा उद्घाटन सोहळा ताज सिटी सेंटर, बुद्ध मार्ग, पाटणा येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माननीय जीतन राम मांझी (केंद्रीय मंत्री, MSME) मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच माननीय आमदार ऋतुराज कुमार यांनी सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमाला हजेरी लावली. ॲडव्होकेट के. जी. अनिलकुमार (गुडविल ॲम्बेसेडर, LACTC आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ICL Fincorp) यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. दीप प्रज्वलनाचा मान श्रीमती उमा अनिलकुमार (पूर्णवेळ संचालक, उपाध्यक्ष आणि सीईओ, ICL Fincorp) यांनी भूषवला. डॉ. राजश्री अजित (कार्यकारी संचालक, ICL Fincorp) यांनी स्वागतपर भाषण केले, तर सतीशन के. पी. (AGM, ऑपरेशन्स आणि ग्रोथ) यांनी आभार प्रदर्शन केले.
विस्ताराचे महत्त्वनवीन प्रादेशिक कार्यालय हे बिहारमधील मुख्य संचालन केंद्र म्हणून काम करेल आणि पाटणा शहराचे वाढते आर्थिक महत्त्व अधोरेखित करेल. या तीन नवीन शाखांमुळे या भागातील कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत होईल, ज्यामुळे ग्राहकांना जलद आणि वैयक्तिक सेवा मिळणे शक्य होईल.
आकर्षक आर्थिक सेवाएक विश्वासार्ह NBFC म्हणून ICL Fincorp व्यक्ती आणि संस्थांना विविध आर्थिक सेवांच्या माध्यमातून सक्षम बनवते. यामध्ये गोल्ड लोन (सोने तारण कर्ज) केवळ ९% वार्षिक या स्पर्धात्मक व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते.
कंपनीची ३० वर्षांची यशस्वी वाटचालICL Fincorp ने गेल्या ३० वर्षांत एक मजबूत पाया तयार केला आहे. आज कंपनीकडे २,००० पेक्षा जास्त कर्मचारी, ३०० पेक्षा जास्त नियुक्त प्रतिनिधी आणि संपूर्ण भारतात ३५ लाखांहून अधिक समाधानी ग्राहक आहेत. विश्वास, वेगळेपण आणि उत्कृष्ट सेवा या मूल्यांच्या जोरावर कंपनी सातत्याने प्रगती करत आहे. ॲडव्होकेट के. जी. अनिलकुमार आणि श्रीमती उमा अनिलकुमार यांच्या नेतृत्वाखाली पाटण्यातील हा विस्तार सामान्य जनतेपर्यंत व्यावहारिक आर्थिक उपाय पोहोचवण्याची कंपनीची बांधिलकी दर्शवतो.
वाचा - युद्धाच्या आगीत बाजार होरपळला! एअरलाईन्स-पेंट्स शेअर्स धडाम; झटक्यात १० लाख कोटी बुडालेICL Fincorp आपल्या ग्राहकांचे समाधान, नैतिक व्यवसाय पद्धती आणि दीर्घकालीन विकासासाठी सदैव समर्पित आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या ICL Fincorp शाखेला भेट द्या किंवा www.iclfincorp.com या वेबसाइटवर लॉग ऑन करा. चौकशीसाठी टोल-फ्री क्रमांक: १८०० ३१ ३३३ ५३ वर कॉल करा.
Web Summary : ICL Fincorp expands in Bihar, inaugurating a regional office and three branches in Patna. This expansion strengthens its presence and offers enhanced financial services, including competitive gold loans, to a wider customer base, building on its 30-year legacy.
Web Summary : आईसीएल फिनकॉर्प ने बिहार में विस्तार किया, पटना में एक क्षेत्रीय कार्यालय और तीन शाखाएँ खोलीं। यह विस्तार इसकी उपस्थिति को मजबूत करता है और व्यापक ग्राहक आधार को प्रतिस्पर्धी स्वर्ण ऋण सहित बेहतर वित्तीय सेवाएं प्रदान करता है, जो इसकी 30 साल की विरासत पर आधारित है।