Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tata Sierra साठी २ लाखांचं डाऊन पेमेंट केलं तर किती लागेल EMI, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 09:44 IST

Tata Sierra EMI Calculation: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सनं देशभरात आपल्या 'सिएरा' या नवीन मॉडेलची डिलिव्हरी सुरू केली आहे. टाटा मोटर्सनं गेल्या वर्षी सिएरा नवीन लूकसह लाँच केली होती.

Tata Sierra EMI Calculation: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सनं (TMPV) देशभरात आपल्या 'सिएरा' या नवीन मॉडेलची डिलिव्हरी सुरू केली आहे. टाटा मोटर्सनं गेल्या वर्षी सिएरा नवीन लूकसह लाँच केली होती. भारतात टाटा सिएरा ११.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल, तर या एसयूव्हीच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १७.९९ लाख रुपये आहे. जर आपण टाटा सिएरासाठी २ लाख रुपयांचं डाउन पेमेंट केलं, तर दरमहा किती ईएमआय (EMI) भरावा लागेल? जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

टाटा सिएराच्या विविध मॉडेल्सच्या किमती

टाटा सिएराच्या 'स्मार्ट प्लस' या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ११,४९,००० रुपये आहे, तर दिल्लीत याची ऑन-रोड किंमत सुमारे १३.३० लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे, 'ॲडव्हेंचर प्लस पेट्रोल टर्बो' या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १७.९९ लाख रुपये आणि दिल्लीतील ऑन-रोड किंमत २०.७५ लाख रुपये आहे. वेगवेगळ्या शहरांनुसार आणि अ‍ॅक्सेसरीजमुळे कारच्या ऑन-रोड किमतीत बदल होऊ शकतो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

PNB मधून ₹५० लाखांचं Home Loan लोन घेण्यासाठी किती असली पाहिजे Salary, किती लागेल EMI?

बेस मॉडेल 'स्मार्ट प्लस'साठी ईएमआय गणित

समजा, आपण १३.३० लाख रुपये ऑन-रोड किंमत असलेले 'स्मार्ट प्लस' मॉडेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर उरलेल्या ११.३० लाख रुपयांच्या कर्जासाठी ५ वर्षांचा कालावधी निवडला, तर ८.५ टक्के व्याजदरानं आपल्याला दरमहा सुमारे २३,१९३ रुपये ईएमआय भरावा लागेल. जर हेच कर्ज ३ वर्षांसाठी घेतलं तर मासिक हप्ता ३५,६८५ रुपये असेल आणि ७ वर्षांसाठी घेतल्यास तो १७,९०२ रुपयांपर्यंत खाली येईल.

टॉप मॉडेल 'ॲडव्हेंचर प्लस'साठी ईएमआयचा हिशोब

२०.७५ लाख रुपये ऑन-रोड किंमत असलेल्या 'ॲडव्हेंचर प्लस' या टॉप मॉडेलसाठी २ लाख रुपयांचं डाउन पेमेंट केल्यावर १८.७५ लाख रुपयांचे कर्ज उरतं. ८.५ टक्के व्याजदराच्या हिशोबानं ५ वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा सुमारे ३८,४८६ रुपये ईएमआय येईल. जर ३ वर्षांसाठी कर्ज घेतलं तर हप्ता ५९,२१६ रुपये असेल आणि ७ वर्षांसाठी तो २९,७०७ रुपये इतका असेल. ईएमआयचा भार कमी करण्यासाठी ग्राहक डाउन पेमेंटची रक्कम वाढवू शकतात.

आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, आपल्या कारची किंमत ही आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. तसंच, कार लोनचा ईएमआय आपल्या हातात येणाऱ्या पगाराच्या (In-hand salary) २० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. ही काळजी घेतल्यास तुमची आर्थिक स्थिती भक्कम राहते, कोणतीही आर्थिक समस्या उद्भवत नाही आणि तुमची गुंतवणूकही सुरक्षित राहते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Sierra EMI Calculation: Down Payment and Monthly Installments Explained

Web Summary : Tata Motors delivers the new Sierra. With a ₹2 lakh down payment, EMIs vary based on model and loan tenure. The 'Smart Plus' EMI for 5 years is ₹23,193, while the 'Adventure Plus' is ₹38,486. Experts advise keeping car costs below 50% of annual income.
टॅग्स :टाटाकार