Join us  

Savings Bank Account बंद केल्यास किती आकारलं जातं शुल्क, ५ मोठ्या बँकांमध्ये किती आहे फी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:31 PM

जर तुम्हाला मोठ्या खासगी बँकेत बचत खातं उघडायचं असेल तर तुम्हाला काही चार्जेसपासून ते मिनिमम बॅलन्सपर्यंत अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

Savings Bank Account : जर तुम्हाला मोठ्या खासगी बँकेत बचत खातं (Savings Bank Account) उघडायचं असेल तर तुम्हाला काही चार्जेसपासून ते मिनिमम बॅलन्स (Minimum Balance) पर्यंत अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. काही वेळा बँका शुल्क वाढवतात आणि त्यानंतर खातेधारकांना आपण अकाऊंट बंदच करून टाकवं असं वाटतं.जेव्हा काही लोक नोकरी बदलतात आणि नवीन कंपनीत दुसरं खातं उघडतात तेव्हा त्यांचं जुनं सॅलरी अकाऊंट बचत खात्यात रूपांतरित होते आणि त्यावर शुल्क आकारलं जाऊ लागतं. अशा परिस्थितीतही अनेकवेळा ग्राहकाला आपण आपलं खातं बंद करावं असं वाटतं. आता प्रश्न असा आहे की खातं उघडण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही, परंतु ते बंद करण्यासाठी काही शुल्क (Account Closing Charge) आकारलं जातं का? हे पाहूया. काही मोठ्या बँकांच्या वेबसाईटवर पाहिलं तर तर तुमच्या लक्षात येईल की तिथे खाते बंद करण्यासाठी काही शुल्क आकारलं जातं. HDFC bank तुम्हाला तुमचं एचडीएफसीचं खातं बंद करायचं असल्यास, वेगवेगळ्या परिस्थितीत शुल्क वेगवेगळं आहे. तुम्ही तुमचं खातं उघडल्यानंतर १४ दिवसांच्या आत बंद केल्यास, तुम्हाला कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही. जर तुम्ही तुमचं खातं १५ दिवस ते १२ महिन्यांच्या दरम्यान बंद केलं तर तुम्हाला ५०० रुपये शुल्क द्यावं लागेल. तर ज्येष्ठ नागरिकांना ३०० रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही तुमचं बँक खातं १२ महिन्यांनंतर बंद केलं तर तुम्हाला कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही.

SBIस्टेट बँकेकडून एका वर्षनंतर आपलं बँक अकाऊंट बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. सुरुवातीच्या १४ दिवसांतही अकाऊंट बंद केलं तर शुल्क आकारलं जात नाही. परंतु १५ दिवस ते १ वर्षादरम्यान अकाऊंट बंद केल्यास तुमच्याकडून क्लोझिंग फी ५०० रुपये आणि त्यावर जीएसटी आकारला जातो.ICICI BankICICI Bank चं अकाऊंट जर तुम्ही सुरुवातीच्या ३० दिवसांत बंद केलं तर तुमच्याकडून शुल्क आकारलं जात नाही. परंतु ३१ दिवस ते १ वर्षादरम्यान अकाऊंट बंद करायचं असल्यास तुमच्याकडून ५०० रुपये + जीएसटी आकारले जाईल. वर्षभरानंतर अकाऊंट बंद करायचं असल्यास कोणतंही शुल्क नाही.

Canara Bankजर तुम्ही Canara Bank चं सेव्हिंग अकाऊंट बंद केलं तर सुरुवातीच्या १४ दिवसांत तुमच्याकडून कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. १४ दिवस ते १ वर्षादरम्यान तुम्हाला अकाऊंट बंद करायचं झाल्यास २०० रुपये क्लोजिंग फी + जीएसटी द्यावा लागेल. १ व वर्षानंतर अकाऊंट बंद करण्यासाठी १०० रुपये + जीएसटी असं शुल्क आकारलं जाईल.

Punjab and Sindh Bankपंजाब अँड सिंध बँकमध्ये सेव्हिंग अकाऊंट सुरुवातीच्या १४ दिवसांत बंद करायचं झाल्यास कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. १५ दिवस ते १२ महिन्यांदरम्यान तुमच्याकडून ३०० ते ५०० रुपयांदरम्यान क्लोजिंग फी आकारली जाईल.

टॅग्स :बँकआयसीआयसीआय बँकएचडीएफसीएसबीआय