Join us

RBI : एक व्यक्ती किती बँक अकाऊंट उघडू शकते? जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 10:53 IST

RBI Bank Accounts Rule : आजच्या काळात जवळपास प्रत्येकाचं बँक खातं आहे. कधीकधी लोकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात.

RBI Bank Accounts Rule : आजच्या काळात जवळपास प्रत्येकाचं बँक खातं आहे. कधीकधी लोकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एकापेक्षा जास्त बँक खाती असलेल्यांसाठी रिझर्व्ह बँकेनं अलर्ट जारी केला आहे. बँक खाते ठेवण्याचा नियमही रिझर्व्ह बँकेनं तयार केलाय. जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीची नियमांनुसार किती बँक खाती असावी.

बँकेच्या वतीने ग्राहकांना अनेक प्रकारची खाती उघडण्याची सुविधा दिली जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार सॅलरी अकाऊंट, करंट अकाऊंट, सेव्हिंग अकाऊंट किंवा जॉईंट अकाऊंट उघडू शकता. बहुतेक ग्राहक बचत खातंच उघडतात. या खात्यावर तुम्हाला व्याजाचा लाभही मिळतो. हे एक बेसिक बँक अकाऊंट आहे.

सेव्हिंग आणि करंट अकाऊंटयाशिवाय जर आपण करंट अकाऊंटबद्दल बोललो तर जे व्यवसाय करतात किंवा ज्यांचे व्यवहार खूप जास्त आहेत, ते करंट अकाऊंट उघडू शकतात. याशिवाय, सॅलरी अकाऊंटदेखील झिरो बॅलन्स अकाऊंट असतो. पगार दर महिन्याला जमा होतो, त्यामुळे शिल्लक ठेवण्याची गरज नाही.

किती अकाऊंट उघडू शकता?याशिवाय जर आपण जॉइंट अकाउंटबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही हे खातं तुमच्या कुटुंबीयांसह किंवा जोडीदारासह उघडू शकता. याशिवाय, भारतात एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असू शकतात यावर कोणतीही मर्यादा नाही. लोक त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची खाती उघडू शकतात. देशात बँक खातं ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांवर अशी कोणतीही मर्यादा घातलेली नाही.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक