Gupta Power Infra Bank Fraud: सरकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पंजाब नॅशनल बँकेची 270 कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर ओडिशाच्या गुप्ता पॉवर इन्फ्राने बँक ऑफ इंडियाचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बँकेने आरबीआयला संपूर्ण माहिती दिली आहे.
बँक ऑफ इंडियाची 226 कोटींची फसवणूकशुक्रवारी बँक ऑफ इंडियाने आरबीआयला सांगितले की, ओडिशास्थित गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बँकेसोबत 226.84 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी पीएनबीनेही अशाच एका प्रकरणाची माहिती दिली होती. बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या 226.84 कोटी रुपयांच्या एनपीएला फसवणुकीत टाकण्यात आले आहे.
पंजाब नॅशनल बँकेचीही फसवणूकPNB ने देखील RBI ला 270.57 कोटी रुपयांच्या फसवणुकीची माहिती दिली होती. मंगळवारी बँकेने आरबीआयला सांगितले की, याच गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरने बँकेसोबत 270.57 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. आता या दोन्ही प्रकरणाची माहिती आरबीआयला मिळाली असून, याप्रकरणातील पुढील कारवाई केली जात आहे.