google pay : पर्सनल लोन हा शब्द आता सामान्य झाला आहे. सर्वात वेगवान आणि कमी कागपत्रांमध्ये मिळणारे एकमेव कर्ज आहे. अलीकडच्या काळात वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे आता बँकांसोबत विविध वित्तीय संस्थादेखील यात उतरल्या आहेत. एवढेच काय डिजिटल वॉलेट गुगल पे (GPay) ने देखील पर्सनल लोन देण्यास सुरुवात केली आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलत. गुगल पे विविध बँकांच्या भागिदारीत ३० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे त्वरित वैयक्तिक कर्ज देत आहे. कर्जाचा कालावधी ६ महिने ते ५ वर्षांपर्यंत आहे. जर तुम्ही गुगल पे वरून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? हे माहिती असायला हवे.
गुगल किती व्याज आकारते?जर तुम्ही गुगल पे वरून कर्ज घेतले तर तुम्हाला १०.५०% ते १५% पर्यंत व्याज द्यावे लागू शकते. क्रेडिट स्कोअरच्या आधारे व्याजदर ठरवला जातो. कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. त्यासाठी कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय किमान २१ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या बँक खात्यातून EMI पेमेंट कापले जाते.
कर्जासाठी अर्ज कसा करावा
- गुगल पे अॅप उघडा आणि मनी टॅबवर जा.
- कर्ज विभागात उपलब्ध असलेल्या ऑफर्स पहा.
- उपलब्ध ऑफरवर टॅप करा आणि सूचनांचे पालन करा.
- केवायसी कागदपत्रे अपलोड करा आणि कर्ज करारांवर (Loan Agreements) ई-स्वाक्षरी करा.
- कर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
वाचा - PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
कर्ज भरण्याची प्रक्रियागुगल पे द्वारे कर्जाचा मासिक ईएमआय थेट तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून कापला जातो. म्हणून, दंड टाळण्यासाठी पुरेसा शिल्लक निधी राखणे महत्वाचे आहे. कर्ज अर्ज करताना परतफेडीचे वेळापत्रक, देय तारखा आणि रकमेसह, उघड केले जाते.