Join us

कमी कमावणारे लोकही सहज खरेदी करू शकतील MG Comet EV, १ लाखांच्या DP वर किती लागेल EMI?

By जयदीप दाभोळकर | Updated: April 1, 2025 12:01 IST

MG Comet EV EMI: स्वतःची कार विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु कार खरेदी करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी एका व्यक्तीला लाखो रुपयांची गरज असते.

MG Comet EV EMI: स्वतःची कार विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु कार खरेदी करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी एका व्यक्तीला लाखो रुपयांची गरज असते. अशा तऱ्हेनं सामान्य लोकांना किंवा कमी कमाई करणाऱ्या लोकांना कार खरेदी करणे खूप अवघड जातं, पण आज आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगणार आहोत जी अगदी कमी कमाई करणारे लोकही अगदी सहज खरेदी करू शकतात. एमजी कॉमेट ईव्ही ही सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे. केवळ १ लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह तुम्ही ते घरी आणू शकता.

किती आहे किंमत?

एमजी कॉमेट ईव्हीच्या २०२५ च्या अपडेटेड मॉडेलची सुरुवातीची किंमत फक्त ६.९९ लाख रुपये म्हणजेच जवळपास ७ लाख रुपयांपासून सुरू होते. अशा तऱ्हेनं तुम्ही एमजी कॉमेट ईव्ही केवळ १ लाखाच्या डाउन पेमेंटसह आपल्या घरी आणू शकता. जर तुम्ही दिल्लीत कार खरेदी केली तर तुम्हाला ही कार ७.३० लाख रुपयांना मिळेल. अशावेळी तुम्हाला ६.३० लाख रुपयांचं कर्ज घ्यावं लागेल.

किती बसेल ईएमआय?

जर तुम्ही ५ वर्षांसाठी ६.३० लाख रुपयांचं कर्ज घेत असाल आणि तुम्हाला हे कर्ज ९.८ टक्के व्याजदरानं मिळत असेल तर तुम्हाला दरमहा १३,४०० रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. यामध्ये तुम्ही ५ वर्षात एकूण ७.९९ लाख रुपये भरणार आहात. यात तुम्हाला १.६९ लाख रुपये व्याज म्हणून भरावे लागतील.

काय आहेत फीचर्स?

एमजी कॉमेट ईव्हीची किंमत इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा कमी असली तरी या ईव्हीची वैशिष्ट्ये कमी नाहीत. या कारमध्ये तुम्हाला प्रीमियम लेदर सीट, ४ स्पीकर ऑडिओ सिस्टीम, रियर पार्किंग कॅमेरा, पॉवर फोल्डिंग ओआरव्हीएम, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक असे अनेक अॅडव्हान्स फीचर्स मिळतील. या कारमध्ये १७.३ किलोवॅटची बॅटरी देण्यात आली आहे, जी सिंगल चार्जमध्ये २३० किमीपर्यंतची रेंज देऊ शकते.

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरबँक