Credit Card : आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड हे केवळ एक पेमेंट ऑप्शन नसून, तुमच्या क्रेडिट हिस्ट्री आणि फायनान्शियल प्रोफाइलचा महत्त्वाचा भाग बनले आहे. तुमच्यापैकी अनेकांकडे क्रेडिट कार्ड असेल. विशेष म्हणजे, ज्या बँकेत खाते नाही, त्या बँक्चेही क्रेडिट कार्ड मिळवता येते. फिनटेक आणि एनबीएफसी कंपन्यांमुळे असे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
बँक खाते आता बंधनकारक नाही
जर अर्जदाराने काही मूलभूत अटी पाळल्या, तर सेव्हिंग अकाउंट न उघडताही क्रेडिट कार्ड मिळू शकते. सध्या अनेक स्वतंत्र वित्तीय संस्था, एनबीएफसी आणि फिनटेक प्लॅटफॉर्म्स असे क्रेडिट कार्ड ऑफर करत आहेत, ज्यासाठी सेव्हिंग अकाउंटची गरज नसते. या कार्ड्समुळे ग्राहकांना पारंपरिक बँक कार्डप्रमाणेच शॉपिंग, बिल पेमेंट, ट्रॅव्हल बुकिंग अशा सुविधा मिळतात. तसेच, हे कार्ड्स क्रेडिट स्कोर वाढवण्यात मदत करतात. वेळेवर बिल भरणाऱ्या ग्राहकांचा स्कोर चांगला राहतो, ज्यामुळे भविष्यात लोन मिळवणे सोपे जाते.
कोणाला मिळू शकते असे क्रेडिट कार्ड?
अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे हवे.
स्थिर उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक (नोकरी/व्यवसाय) आहे.
सामान्यतः 750 किंवा अधिक क्रेडिट स्कोर असणे अपेक्षित आहे.
आवश्यक कागदपत्रे :
पॅन कार्ड आणि आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
पत्त्याचा पुरावा (उदा. वीज/पाणी बिल)
उत्पन्नाचा पुरावा – पगारदारांसाठी सॅलरी स्लिप, तर व्यवसायिकांसाठी बँक स्टेटमेंट/आयकर रिटर्न.
बँक खात्याविना क्रेडिट कार्डचे फायदे
किमान शिल्लक ठेवण्याचा त्रास नाही- बँक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास दंड आकारला जातो. या कार्ड्समध्ये असा कोणताही दबाव नसतो.
सोपे बिल पेमेंट- UPI, PhonePe, Google Pay, Paytm किंवा थेट स्टोअरवर बिल भरता येते. बँक खाते लिंक नसेल तरी अडचण नाही.
रिवॉर्ड्स आणि चांगला क्रेडिट स्कोर- या कार्ड्सवरही कॅशबॅक/रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. वेळेवर बिल भरून आपण क्रेडिट स्कोर सुधारू शकतो, ज्याचा उपयोग भविष्यात मोठे कर्ज किंवा दुसरा क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी होतो.