Join us  

SBI, PNB, HDFC आणि ICICI  बँकेच्या ATM मधून आता पैसे काढताना द्यावे लागणार शुल्क? नियमात मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 10:47 AM

RBI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर, केलेल्या प्रत्येक व्यवहारावर जास्तीत जास्त 21 रुपये एवढे शुल्क आकारू शकतात.

नवी दिल्ली - देशातील सर्वच बँकांच्या एटीएममध्ये ग्राहकांना दरमहिन्याला काही ठराविक वेळा आपले व्यवहार मोफत करता येतात. मात्र ही मर्यादा ओलांडल्यानंतर, ग्राहकांना प्रत्येक एटीएम व्यवहारावर अतिरिक्त शुल्क आकारले जाते. RBI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर, केलेल्या प्रत्येक व्यवहारावर जास्तीत जास्त 21 रुपये एवढे शुल्क आकारू शकतात. अधिकांश बँका ग्राहकांना दर महिन्याला 5 मोफत ट्रान्झॅक्शनची सुविधा देतात. तर जाणून घेऊयात देशातील काही प्रमुख बँकांच्या नियमांसंदर्भात -

Punjab National Bank ATM -PNB मेट्रो आणि नॉन-मेट्रो दोन्ही भागांतील एटीएममध्ये दरमहा 5 विनामूल्य ट्रान्झॅक्शनला परवानगी देते. यानंतर ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर 10 रुपये आकारले जातील. याशिवाय, इतर बँकांच्या एटीएममध्ये मेट्रो शहरांमध्ये तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य ट्रान्झॅक्शन देते. यासाठी PNB आर्थिक ट्रान्झॅक्शनसाठी 21 रुपये प्लस टॅक्स वसूल करते. तसेच गैर-आर्थिक व्यवहारांसाठी PNB 9 रुपये प्लस शुल्क आकारते.

SBI ATM - स्टेट बँक ऑफ इंडिया 25,000 रुपयांपेक्षा अधिकच्या सरासही मासिक शिल्लकीसाठी आपल्या ATM वर 5 विनामूल्य ट्रन्झॅक्शन (गैर-आर्थिक आणि आर्थिकसह) देते. या वरील देवानघेवाणीला मर्यादा नाही. मर्यादेपेक्षा अधिकच्या आर्थिक व्यवहारावर एसबीआय एटीएमवर जीएसटीसह 10 रुपये शुल्क आकारते. इतर बँकांच्या एटीएमवर, अशा प्रति व्यवहारासाठी 20 रुपये प्लस जीएसटी आहे.

ICICI Bank ATM -ICICI Bank आपल्या ग्राहकांना दर महिन्याला गैर-मेट्रो भागात 5 आणि 6 मेट्रो भागांत 3 मोफत व्यवहार देते. यानंतर, आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर प्रत्येक गैर-आर्थिक व्यवहारासाठी 8.5 रुपये आणि प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 21 रुपये शुल्क आकारते.

HDFC Bank ATM -HDFC बँकेच्या ATM वर दर महिन्याला 5 मोफत व्यवहारांची मर्यादा आहे. इतर एटीएमसाठी मेट्रो भागांत ही मर्यादा 3, तसेच  गैर-मेट्रो भागांत ही मर्यादा 5 व्यवहारांची आहे. मर्यादेनंतरच्या प्रत्येक व्यवहारावर बँक ग्राहकांना प्रत्येक आर्थिक व्यवहारावर 21 रुपये, तर प्रत्येक गैर-आर्थिक व्यवहारासाठी 8.5 रुपये शुल्क आकारते.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकएसबीआयएचडीएफसीआयसीआयसीआय बँकपंजाब नॅशनल बँक