Join us

Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा

By जयदीप दाभोळकर | Updated: May 8, 2025 10:29 IST

Cheapest Home Loan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गेल्या काही महिन्यांत रेपो दरात (रेपो रेट) ०.५० टक्क्यांची कपात केली आहे, त्यानंतर बँकांनीही कर्जाच्या व्याजदरात कपात केली. गृहकर्जाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडच्या काळात ते पूर्वीपेक्षा स्वस्त झालंय.

Cheapest Home Loan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गेल्या काही महिन्यांत रेपो दरात (रेपो रेट) ०.५० टक्क्यांची कपात केली आहे, त्यानंतर बँकांनीही कर्जाच्या व्याजदरात कपात केली. गृहकर्जाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडच्या काळात ते पूर्वीपेक्षा स्वस्त झालंय. काही बँका सर्वात स्वस्त व्याजदरानं गृहकर्जही देत आहेत. जर तुम्हीही सर्वात स्वस्त गृहकर्जाच्या शोधात असाल तर अशा अनेक बँका आहेत ज्या स्वस्त कर्ज देत आहेत. इथे एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की, तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तरच तुम्हाला सर्वात स्वस्त गृहकर्ज मिळेल.

सिबिल स्कोअर ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. सिबिल स्कोअर आपली क्रेडिटपात्रता दर्शवितो. हा स्कोअर आपल्या क्रेडिट हिस्ट्रीवर आधारित असतो, ज्यात आपल्या मागील कर्ज आणि क्रेडिट कार्ड देयकांचा समावेश केला जातो. चला तर मग आपण काही बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांबद्दल जाणून घेऊ ज्या तुम्हाला सर्वात स्वस्त व्याजदरात गृहकर्ज देऊ शकतात.

रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?

एसबीआय 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सध्या ८ टक्के या सुरुवातीच्या व्याजदरानं गृहकर्ज देत आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर उत्तम असेल तर तुम्ही एसबीआयकडून या दरानं होम लोन घेऊ शकता. बँकेचे गृहकर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटशी (ईबीएलआर) जोडलेलं असतं. म्हणजेच बेंचमार्क रेटमध्ये (रेपो) बदल झाल्यास गृहकर्ज खात्यातील व्याजदरातही बदल होतो. रेपो रेट वाढल्यास गृहकर्जाचा व्याजदर वाढेल.

बजाज हाऊसिग फायनान्स

जर तुम्ही स्वस्त गृहकर्जाच्या शोधात असाल तर बजाज हाऊसिंग फायनान्सकडूनही गृहकर्ज घेऊ शकता. हाऊसिंग फायनान्स कंपनी सध्या ७.९९ टक्के व्याजदरानं गृहकर्ज देत आहे. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त १५ कोटी रुपयांपर्यंत गृहकर्ज घेऊ शकता आणि परतफेडीचा कालावधी ३२ वर्षांपर्यंत निवडू शकता. मात्र, कर्ज परतफेडीचा कालावधी जितका कमी असेल तितका तो कमी खर्चिक होईल.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स

आणखी एक हाउसिंग फायनान्स कंपनी म्हणजे एलआयसी हाऊसिंग फायनान्स, जिथून तुम्ही परवडणाऱ्या दरात गृहकर्ज घेऊ शकता. एलआयसी हाऊसिंग सध्या ८ टक्के व्याजदरानं गृहकर्ज देत आहे. कंपनीनं नुकताच हा नवा दर २८ एप्रिल २०२५ पासून लागू केला आहे.

बँक ऑफ बडोदा 

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा सध्या ८ टक्के व्याजदरानं गृहकर्ज देतं. बँकेनं नुकताच सुरुवातीचा व्याजदर ८.४० टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणला आहे.

टॅग्स :बँकपैसा