Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिली कार घेताय? १० लाखांच्या कारसाठी किती पगार हवा? डाऊन पेमेंट आणि EMI चे संपूर्ण गणित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:25 IST

Car Loan : जर तुम्ही तुमची पहिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती उपयुक्त ठरेल. १० लाख रुपयांच्या कारसाठी तुम्हाला किती कर्ज मिळू शकते आणि किती डाउन पेमेंट आवश्यक आहे ते जाणून घ्या.

Car Loan : आजच्या धावपळीच्या युगात स्वतःची कार असणे ही केवळ चैन राहिलेली नसून ती एक गरज बनली आहे. मात्र, पहिल्या कारची खरेदी करताना, विशेषतः १० लाख रुपयांच्या बजेटमध्ये, आर्थिक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. बहुतांश मध्यमवर्गीय ग्राहक बँकेच्या कर्जावरच विसंबून असतात. अशा वेळी तुमचा पगार किती असावा, डाऊन पेमेंट किती भरावे आणि कर्जाचा हप्ता किती असेल, याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे.

डाऊन पेमेंट : खिशातील गुंतवणूक किती?बँका आणि वित्तीय संस्था साधारणपणे कारच्या ऑन-रोड किमतीच्या ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. १० लाखांची कार घ्यायची असल्यास बँक तुम्हाला अंदाजे ८.५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देईल. उरलेले १.५ ते २ लाख रुपये तुम्हाला 'डाऊन पेमेंट' म्हणून स्वतः भरावे लागतील. तुम्ही जेवढे जास्त डाऊन पेमेंट कराल, तेवढे कर्ज कमी लागेल आणि तुमच्या मासिक हप्त्याचा बोजाही कमी होईल.

पगाराचे आणि ईएमआयचे गणितबँकिंग नियमांनुसार, तुमचा मासिक हप्ता तुमच्या पगाराच्या ५० टक्क्यांहून अधिक नसावा. जर तुम्ही ८.५ लाखांचे कर्ज ५ वर्षांसाठी ९% व्याजदराने घेतले, तर तुमचा ईएमआय साधारणपणे २०,००० ते २१,००० रुपयांच्या दरम्यान असेल. हा हप्ता सहजपणे फेडण्यासाठी तुमचा मासिक पगार ४५,००० ते ५०,००० रुपयांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न ६ ते ६.५ लाख रुपये असल्यास १० लाखांची कार खरेदी करणे तुमच्या बजेटमध्ये बसेल.

कोणत्या बँकेत काय आहे व्याजदर?कर्ज घेण्यापूर्वी बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

बँक व्याजदर (अंदाजे) 
युको बँक७.६०%
कॅनरा बँक७.७०%
स्टेट बँक ऑफ इंडिया८.९०%
ICICI बँक९.१०%
HDFC बँक९.२०%

(टीप: प्रोसेसिंग फी आणि इतर चार्जेस बँकांनुसार बदलू शकतात.)*

वाचा ८ वा वेतन आयोग : मूळ पगार दुप्पट होणार? 'फिटमेंट फॅक्टर'नुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो?

या ३ गोष्टी लक्षात ठेवा

  • कर्जाचा कालावधी : कर्जाचा कालावधी जेवढा लांब असेल (उदा. ७ वर्षे), तेवढा ईएमआय कमी होईल, पण तुम्हाला व्याजापोटी अधिक रक्कम मोजावी लागेल. शक्य असल्यास ५ वर्षांची मुदत निवडा.
  • क्रेडिट स्कोअर : तुमचा सिबिल स्कोअर ७५० च्या वर असल्यास तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते.
  • इतर खर्च : कार खरेदी करताना केवळ ईएमआयचा विचार करू नका; पेट्रोल/डिझेल खर्च, विमा आणि मेंटेनन्स यांसाठीही महिन्याला किमान ४-५ हजार रुपये बाजूला ठेवावे लागतील. 
English
हिंदी सारांश
Web Title : First car? Salary needed for ₹10 lakh car: EMI math!

Web Summary : Buying a ₹10 lakh car? Down payment, EMI, and salary calculations are crucial. Banks offer up to 85% loan; higher down payments reduce EMIs. A ₹45,000-₹50,000 monthly income is generally needed.
टॅग्स :कारबँकिंग क्षेत्रबँक