Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट स्कोअर कमी आहे, तरी बँकेचं कर्ज मिळेल का? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:10 IST

आजकाल बहुतांश बँका आणि वित्तीय संस्था कोणतीही सिक्युरिटी न घेता पर्सनल लोन देत आहेत. त्या केवळ तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर पाहतात. परंतु क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.

आजकाल बहुतांश बँका आणि वित्तीय संस्था कोणतीही सिक्युरिटी न घेता पर्सनल लोन देत आहेत. त्या केवळ तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर पाहतात. परंतु क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. काही उपाययोजना करून यातूनही मार्ग काढणं शक्य आहे. 

स्कोअर कमी असताना जास्त रकमेच्या लोनसाठी अर्ज करू नका. यात देणाऱ्याला जोखीम वाटत असते. त्यामुळे त्यामुळे छोट्या रकमेच्या कर्जासाठी अर्ज करा. अर्ज करताना अलिकडे झालेली पगार किंवा उत्पन्नातील वाढ याचे पुरावे सादर करा. अतिरिक्त उत्पन्न स्रोताची लेंडरला खात्री द्या.

गोल्ड लोन गॅरेंटी ते UPI पेमेंट लिमिटपर्यंत... बदलणार बँकांशी निगडीत ६ मोठे नियम

जर तुमचा स्कोअर कमी असेल, तर अशा व्यक्तीला सहकर्जदार करा ज्याची स्कोअर चांगला आहे. यामुळे लोन लवकर मंजूर होण्याची शक्यता वाढते. पर्सनल लोनमध्ये सहसा काहीही गहाण ठेवावं लागत नाही. पण काही कर्जदाते सुरक्षा म्हणून गहाण ठेवण्यास सांगतात. त्यामुळे लोन मिळण्याची शक्यता वाढते. स्कोअर चांगला राहावा यासाठी तुम्ही वेळेवर ईएमआय तसेच क्रेडिट कार्डचं पेमेंट करा. तुम्ही किती रकमेचं कर्ज घेतलं आहे, याचाही परिणाम होतो. क्रेडिट हिस्ट्री जितकी दीर्घ आणि स्वच्छ असेल तितकं फायद्याचं ठरतं.

टॅग्स :बँक