Business Loan: देशातील सूक्ष्म आणि लघुउद्योगांसाठी (MSME) दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता उद्योजकांना कोणतीही मालमत्ता तारण न ठेवता ₹२ कोटींपर्यंत व्यवसाय कर्ज मिळू शकणार आहे. ही सुविधा CGTMSE या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून MSME क्षेत्राला चालना देण्यासाठी ही महत्त्वाची पाऊल उचलण्यात आली असून, नव्या तसेच विद्यमान उद्योजकांना याचा फायदा होणार आहे.
ही योजना MSME मंत्रालय आणि SIDBI यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाते. या अंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांना कर्जावर हमी कव्हर दिले जाते. जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही, तर त्या रकमेपैकी सुमारे ७५% ते ८५% भाग ट्रस्टकडून भरून काढला जातो. त्यामुळे बँका कोणतीही सिक्युरिटी न घेता कर्ज देण्यास तयार होतात. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या छोट्या व्यवसायांकडे बँकेला देण्यासाठी तारण नसते, अशांना सहज वित्तपुरवठा उपलब्ध करून देणे.
या योजनेचा लाभ उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) आणि सेवा क्षेत्रातील सूक्ष्म व लघुउद्योगांना मिळू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, काही खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) तसेच अनेक NBFC संस्था या योजनेअंतर्गत कर्ज देतात. अलीकडील बदलांनंतर, या योजनेतून कोणतीही हमी न देता ₹२ कोटींपर्यंत कर्ज मिळणे शक्य झाले आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर, अर्जदाराला जमीन, घर किंवा सोने तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. महिला उद्योजक, ईशान्येकडील राज्यांतील उद्योग आणि सूक्ष्म उद्योगांसाठी हमी कव्हर ८५% पर्यंत दिले जाते. जर ₹२ कोटींपेक्षा जास्त कर्जाची गरज असेल, तर काही भाग तारण ठेवून उर्वरित रकमेवर CGTMSE हमीचा लाभ घेता येतो. या कर्जावरील व्याजदर स्पर्धात्मक असून ते रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरवले जातात.
या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी उद्योजकाने सविस्तर बिझनेस प्लान तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित बँकेत CGTMSE योजनेखाली अर्ज करता येतो. बँक व्यवसाय मॉडेलवर समाधानी असल्यास, ती ट्रस्टकडून हमी कव्हर घेऊन कर्ज मंजूर करते. एकूणच, CGTMSE योजनेमुळे देशातील लघुउद्योगांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, रोजगारनिर्मिती आणि उद्योगवाढीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Web Summary : MSMEs can now access ₹2 crore business loans without collateral under the CGTMSE scheme. This initiative by the MSME Ministry and SIDBI aims to boost small businesses by providing banks with guarantee cover, facilitating easier access to finance for manufacturing and service sectors.
Web Summary : MSME अब CGTMSE योजना के तहत बिना किसी गारंटी के ₹2 करोड़ तक का व्यवसाय ऋण प्राप्त कर सकते हैं। MSME मंत्रालय और SIDBI की इस पहल का उद्देश्य बैंकों को गारंटी कवर प्रदान करके छोटे व्यवसायों को बढ़ावा देना है, जिससे विनिर्माण और सेवा क्षेत्रों के लिए वित्त तक आसान पहुंच संभव हो सके।