Benefits of Zero Interest EMI: आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शॉपिंगवरील डिस्काउंट, कॅशबॅक आणि EMI सुविधेमुळे ग्राहकांना महागड्या खरेदी सहज करता येतात. विशेषतः Zero Interest EMI (नो-कॉस्ट EMI) ही सुविधा लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. मात्र, ही EMI सुविधा खरोखरच ‘बिनव्याजी’ असते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
Zero-Interest EMI म्हणजे काय?
Zero-Interest EMI म्हणजे एखाद्या वस्तूची संपूर्ण रक्कम एकदम न देता ती हप्त्यांमध्ये (EMI) भरायची, मात्र त्यावर वेगळे व्याज आकारले जात नाही. या सुवेधित EMI कालावधी साधारण ३ ते २४ महिने असतो. ५,००० रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर उपलब्ध हा पर्याय मिळतो.
खरंच Zero-Interest असते का?
ही सुविधा बँकेकडून मिळते. मात्र, विक्रेता आधीच डिस्काउंट देऊन व्याजाची रक्कम मिळवतो, त्यामुळे ग्राहकाला अतिरिक्त चार्ज नसल्याचा भास होतो. पण, तज्ज्ञांच्या मते, Zero-Interest EMI पूर्णपणे मोफत नसते. अनेकदा वस्तूची किंमत आधीच वाढवलेली असते आणि त्यातच व्याजाचा खर्च समाविष्ट केलेला असतो. काही वेळा प्रोसेसिंग फी आकारली जाते आणि EMI व्यवहारांवर GST देखील लागू केला जातो.
उदाहरणातून समजून घ्या
समजा एखाद्या वस्तूची किंमत १ लाख रुपये आहे आणि ६ महिन्यांसाठी व्याज ६,००० रुपये आहे. हे व्याज बँक आकारते, पण विक्रेता आधीच ६,००० रुपयांची सूट देतो. त्यामुळे ग्राहकाला EMI ‘नो-कॉस्ट’ वाटते.
लपलेले खर्च टाळण्यासाठी काय कराल?
वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि दुकानांवर किंमत तुलना करामोठ्या डिस्काउंटवर लगेच विश्वास ठेवू नकावस्तूची खरी बाजारभाव तपासा
EMI घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा
EMI कालावधी प्रोसेसिंग फी आहे का?लवकर कर्ज फेडल्यास दंड कर्जाच्या अटी व शर्ती
एकूणच काय, तर Zero-Interest EMI ही सुविधा सोयीची असली तरी ती पूर्णपणे ‘फ्री’ नसते. ग्राहकांनी आकर्षक ऑफर्स पाहून निर्णय न घेता, त्यामागील अटी आणि लपलेले खर्च नीट समजून घेणे गरजेचे आहे.
Web Summary : Zero-interest EMIs offer convenience but often include hidden costs. Retailers may inflate prices or add processing fees. Compare prices, check for hidden charges, and understand all terms before opting for 'no-cost' EMI to avoid unexpected expenses.
Web Summary : शून्य-ब्याज ईएमआई सुविधाजनक है, पर अक्सर छिपी लागतें शामिल होती हैं। खुदरा विक्रेता कीमतें बढ़ा सकते हैं या प्रोसेसिंग शुल्क जोड़ सकते हैं। अप्रत्याशित खर्चों से बचने के लिए 'नो-कॉस्ट' ईएमआई चुनने से पहले कीमतों की तुलना करें, छिपे हुए शुल्क जांचें और सभी शर्तों को समझें।