Join us

Bank Working Hours : दर आठवड्याला ५ दिवस सुरू राहणार बँका, अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 20:05 IST

बँक कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी मिळू शकते.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारीबँकांना लवकरच आठवड्यातून फक्त ५ दिवस काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. अर्थमंत्रालय लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब करू शकते, असं सीएनबीसी आवाजनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलंय. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज (UFBEs) यांनी ५ दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यासाठी तत्त्वतः सहमती दर्शविली असल्याचं वृत्त यापूर्वी समोर आलं होतं. मात्र, यासाठी बँकांना त्यांच्या कामाचे तास दररोज ४० मिनिटांनी वाढवावे लागतील.

सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना रविवार वगळता प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका खुल्या असतात. एका महिन्यात ५ शनिवार असल्यास, त्या दिवशीही बँका सुरू राहतात.

सीएनबीसी आवाजच्या रिपोर्टनुसार, आयबीएनं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टीचा प्रस्ताव पाठवला होता. म्हणजेच दर सोमवार ते शुक्रवार बँका सुरू राहतील, तर दर शनिवार आणि रविवारी सुट्टी असेल. अहवालानुसार, लवकरच वेज बोर्डाच्या सुधारणांसह अधिसूचना जारी केली जाऊ शकते.

टॅग्स :बँकसरकार