Bank of Baroda FD scheme: देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असलेल्या Bank of Baroda आपल्या ग्राहकांना विविध मुदत ठेवी (FD) योजनांवर आकर्षक परतावा देत आहे. बँकेकडून विविध कालावधीच्या FD योजनांवर ३.५० टक्क्यांपासून ते ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याजदर दिले जात आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरत आहे.
७ दिवसांपासून FD ची सुविधा
बँक ऑफ बडोदा ग्राहकांना किमान ७ दिवसांच्या कालावधीपासून FD खाते उघडण्याची सुविधा देते. ७ दिवस ते ४५ दिवसांच्या FD वर बँक ३.५०% ते ४.००% पर्यंत व्याज देत आहे. तर, बँकेची ४४४ दिवसांची स्पेशल FD योजना सर्वाधिक चर्चेत असून, या योजनेवर सामान्य ग्राहकांना ६.४५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.०५% पर्यंत व्याज मिळत आहे. याशिवाय, ५ ते १० वर्षांच्या FD योजनांवर तर बँक ६.००% ते ७.००% पर्यंत व्याजदर ऑफर करत आहे.
₹२ लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल ?
जर एखाद्या नागरिकाने बँक ऑफ बडोदाच्या ७२ महिन्यांच्या, म्हणजेच ६ वर्षांच्या FD योजनेत ₹२ लाखांची गुंतवणूक केली, तर मुदतपूर्तीनंतर त्याला ₹८५,९०१ इतके निश्चित व्याज मिळेल. म्हणजेच एकूण परतावा ₹२,८५,९०१ इतका होईल. दुसरीकडे, जर गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपेक्षा जास्त वय) किंवा अति ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांपेक्षा जास्त वय) असेल, तर त्याच ₹२ लाखांच्या गुंतवणुकीवर मुदतपूर्तीनंतर ₹१,०३,२८९ पर्यंत निश्चित व्याज मिळू शकते. अशा परिस्थितीत एकूण मॅच्युरिटी रक्कम ₹३,०३,२८९ पर्यंत जाऊ शकते.
ज्येष्ठ नागरिकांना विशेष फायदा
बँक ऑफ बडोदा ५ ते १० वर्षांच्या FD योजनांवर ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांना समान अतिरिक्त व्याजदराचा लाभ देत आहे. त्यामुळे सुरक्षित आणि हमी परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना आकर्षक पर्याय मानली जात आहे.
FD गुंतवणूकदारांसाठी काय महत्त्वाचे?
सध्या शेअर बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. अशावेळी सरकारी बँकांच्या FD योजना स्थिर आणि हमी परतावा देणारा पर्याय ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ज्येष्ठ नागरिकांनी दीर्घकालीन सुरक्षित उत्पन्नासाठी अशा उच्च व्याजदराच्या FD योजनांचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते.
Web Summary : Bank of Baroda offers attractive FD rates, up to 7.05%. Senior citizens benefit most. A ₹2 lakh investment for six years yields ₹1,03,289 interest for seniors, making it a secure investment option.
Web Summary : बैंक ऑफ बड़ौदा आकर्षक एफडी दरें प्रदान करता है, जो 7.05% तक हैं। वरिष्ठ नागरिकों को सबसे अधिक लाभ होता है। छह साल के लिए ₹2 लाख का निवेश वरिष्ठ नागरिकों के लिए ₹1,03,289 ब्याज देता है, जो इसे एक सुरक्षित निवेश विकल्प बनाता है।