Bank Holidays April 2026: तुमची बँकेशी संबंधित काही कामे बाकी असतील, तर पटापट करून घ्या. कारण, एप्रिल महिन्यात एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध सण, रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यामुळे बँकिंग सेवा अनेक दिवस प्रभावित राहणार आहेत.
१ एप्रिलला बँका उघड्या, पण ग्राहकांचे काम होणार नाही
एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. या दिवशी बँका सुरू असतात, मात्र सामान्य ग्राहकांचे व्यवहार होत नाहीत, कारण बँका आर्थिक वर्षाशी संबंधित अंतर्गत कामे पूर्ण करत असतात.
एप्रिलमध्ये एकूण १४ दिवस बँक सुट्ट्या
एप्रिल महिन्यात विविध सणांमुळे सुमारे ८ दिवस बँका बंद राहतील, तर ४ रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार...अशा प्रकारे एकूण १४ दिवस बँकिंग सेवा बंद राहणार आहेत.
महिन्याच्या सुरुवातीलाच बँका बंद
एप्रिलच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच बँका बंद राहणार आहेत.
१ एप्रिल – नवीन आर्थिक वर्ष (ग्राहक व्यवहार नाही)
२ एप्रिल – मौंडी थर्सडे (कोची, तिरुवनंतपुरम)
३ एप्रिल – गुड फ्रायडे (अहमदाबाद, भोपाल, बंगळुरू, मुंबई, दिल्ली, पटना इ.)
५ एप्रिल – रविवार
११ एप्रिल – दुसरा शनिवार
१२ एप्रिल – रविवार
महिन्याच्या दुसऱ्या भागातही अनेक सुट्ट्या
एप्रिलच्या दुसऱ्या भागातही अनेक सणांमुळे बँका बंद राहणार आहेत.
१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी
१५ एप्रिल – बंगाली नववर्ष, बोहाग बिहू, विशू, हिमाचल दिवस
१६ एप्रिल – बोहाग बिहू (गुवाहाटी)
१९ एप्रिल – रविवार
२० एप्रिल – बसव जयंती, अक्षय तृतीया (बंगळुरू)
२१ एप्रिल – गरिया पूजा (अगरतळा)
२५ एप्रिल – चौथा शनिवार
२६ एप्रिल – रविवार
ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना
एप्रिल महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार असल्याने चेक क्लिअरन्स, डीडी, पासबुक, कर्ज, शाखेतील व्यवहार यासाठी आधीच नियोजन करणे आवश्यक आहे. दरम्यान, बँका जरी बंद राहिल्या, तर ऑनलाईन बँकिंग, ATM, UPI, नेट बँकिंग सेवा सुरू राहतील.
Web Summary : Banks will be closed for 14 days in April 2026 due to festivals and weekends. Plan banking needs in advance, as online services remain available.
Web Summary : अप्रैल 2026 में त्योहारों और सप्ताहांत के कारण बैंक 14 दिनों के लिए बंद रहेंगे। पहले से ही बैंकिंग आवश्यकताओं की योजना बनाएं, क्योंकि ऑनलाइन सेवाएं उपलब्ध रहेंगी।