कायझेन व्यवस्थापन - व्यवसायाची नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 02:43 AM2017-11-12T02:43:41+5:302017-11-12T02:44:13+5:30

जपान हा व्यवस्थापनासाठी सर्वात अग्रेसर देश मानला जातो आणि त्यात सुरुवात झाली, एका आगळ्या-वेगळ्या व्यवस्थापनाची. अर्थात, कायझेन व्यवस्थापनाची. प्रत्येक उद्योगावर कोणत्या ना कोणत्या व्यवस्थापनाचा पगडा किंवा प्रभाव हा नेहमीच प्रभावशाली असतो.

Kazan Management - A new business identity | कायझेन व्यवस्थापन - व्यवसायाची नवी ओळख

कायझेन व्यवस्थापन - व्यवसायाची नवी ओळख

googlenewsNext

- शिवांगी झरकर

जपान हा व्यवस्थापनासाठी सर्वात अग्रेसर देश मानला जातो आणि त्यात सुरुवात झाली, एका आगळ्या-वेगळ्या व्यवस्थापनाची. अर्थात, कायझेन व्यवस्थापनाची. प्रत्येक उद्योगावर कोणत्या ना कोणत्या व्यवस्थापनाचा पगडा किंवा प्रभाव हा नेहमीच प्रभावशाली असतो; जपान आणि जापनिस व्यक्ती उद्योग, वेळेचे नियोजन, माइंड सेट, दूरदृष्टी, व्यवस्थापन, निर्मिती या बाबींसाठी नेहमीच जगाहून पुढे राहिले आहेत. आज आपण जपानमधील नामांकित व्यवस्थापनाची अगदी सोप्या पद्धतीने माहिती घेणार आहोत. कायझेन-नवीन बदल... बदलण्यासाठी...
कायझेन म्हणजे चांगल्यासाठी केले गेलेले बदल, पण उद्योगाच्या भाषेत बोलायचे तर याचा अर्थ होतो, सातत्य आणि सतत सुधारणा. कायझेन म्हणजे आपला माइंड सेट, जो उद्योगाप्रमाणे सतत बदलावा लागतो आणि या प्रोसेसमध्ये माइंड सेटप्रमाणे सतत कामाच्या पद्धतीत, व्यवस्थापनात, नियोजनात सकारात्मक बदल करावा लागतो. त्यामुळे कायझेनमध्ये नेहमीच छोटे-छोटे बदल असतात आणि त्या बदलांप्रमाणे त्याचे विशिष्ट काळासाठी नियोजन असते.
कायझेनअंतर्गत येणा-या बाबी:
ग्राहकांचे व्यवस्थापन : ज्यात कोणत्या ग्राहकापासून ग्राहकांचे एकमेकांसोबत असलेले नाते यापर्यंतच्या बाबींचा अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे कामाचे नियोजन केले जाते.
क्वालिटी कंट्रोल : या ६ सिग्मा मेथडचा वापर करून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसची क्वालिटी आणि त्याचा कंट्रोल ठरवला जातो.

रोबोटिक्स : यात उत्पादन व उत्पादन प्रकियेत सातत्य आणि सहजता निर्माण करण्यासाठी मशिनद्वारे उत्पादन केले जाते.

टी.पी.एम. : यात प्रॉडक्शनच्या वेळेला लागणारा मेंटेनन्स आणि खर्चाचा अंदाज काढला जातो.

जस्ट इन टाइम : या पद्धतीत वेळेच्या नियोजनाबाबत सर्व कामकाज केले जाते. कोणत्याही कामासाठी टाइम फ्रेम ठरवून काम केले जाते.

झीरो डिफेक्ट : प्रोजेक्टच्या सुरुवातीपासून प्रोजेक्ट संपेपर्यंत प्रत्येक बाबीचा दर्जा ठरविला जातो.

लघू गट व्यवस्थापन : यात प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक काम वाटले जाते आणि त्याला लहान-लहान भागांमध्ये रूपांतरित करून पूर्ण केले जाते.

नवीन प्रॉडक्ट निर्मिती : यामध्ये नवीन प्रॉडक्टचे सायकल ठरविले जाते. नवीन प्रॉडक्टच्या संपूर्ण निर्मितीबाबतची माहिती अभ्यासली जाते. त्याचा अभ्यास करून मार्केटवर त्याचा होणारा परिणाम ठरविला जातो आणि त्यानंतर ते प्रॉडक्ट कधी, केव्हा, कुठे मार्केटमध्ये आणायचे, ते ठरवून लोकांच्या मनात रुजविले जाते.

कायझेन व्यवस्थापनेतील ५५ टप्पे :
Sort (सोर्ट - क्रमवारी व्यवस्थापन) :
सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सॉर्टिंग - क्रमवारी व्यवस्थापन. आपण उद्योग करतो, पण काय हवे किंवा काय नको, हे आधी जाणत नाही. त्यासाठी सॉर्ट करणे आवश्यक आहे. या टप्प्यात खालील गोष्टी येतात.
- नको असलेल्या गोष्टी कमी करणे.
- वापरात असलेल्या गोष्टी कामाच्या जागेपासून दूर करणे.
- वापरात असलेल्या आणि गरजेच्या वस्तूंचे मूल्यांकन करणे.
- चांगल्या आणि खराब वस्तूंचे अलगीकरण करणे.
- प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महत्त्वाच्या आणि दुय्यम बाबी ठरवून घेणे.
Set in Order (अनुक्रमणिका करणे):
- सर्व महत्त्वाच्या बाबी, वस्तू, प्रोसेसची क्रमवारी करून घेणे आणि त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे अनुक्रमणिका आखणे.
- नुकसान होऊ नये, म्हणून प्रोजेक्ट किंवा प्रोसेसमध्ये लागणाºया वस्तू, माहितीपत्र, प्लान्स जवळ ठेवणे.
- वर्किंग फ्लो डिझाइन करणे.
- फायनांसमध्ये FIFO मेथड वापरणे.
aashine(प्रकाशझोत टाकणे):
- आॅफिस आणि आॅफिसच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे.
- कॉम्प्यूटरमधील नको असलेल्या फाइल्स, डाटा डिलीट करणे.
- सर्व मशिन खराब होऊ नयेत, म्हणून काळजी घेणे.
- उद्योगाला हवे असलेले स्किल्स वाढविणे आणि नको असलेले स्किल्स कमी करणे.
Stadardiz (पृथक्करण करून प्रमाणबद्ध करणे):
- स्वत:च्या कामाचा, प्रोसेसचा, मनुष्यबळाचा, प्रॉडक्टचा, सर्व्हिसेसचा दर्जा वाढविणे आणि त्याला टिकवून ठेवणे.

Web Title: Kazan Management - A new business identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई