पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत. पण नवी ई-स्कूटर घेण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी तपासा!
बॅटरी आणि रेंज: बॅटरी हा स्कूटरचा मुख्य भाग आहे. कंपनीने सांगितलेल्या रेंजपेक्षा प्रत्यक्षात 'सिंगल चार्ज'मध्ये स्कूटर किती किमी धावते, याची खात्री करा.
चार्जिंग वेळ: स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी नेमका किती वेळ लागतो हे तपासा.
बॅटरी वॉरंटी: बॅटरी महाग असते, त्यामुळे त्यावर किमान ३ ते ५ वर्षांची वॉरंटी असणे आवश्यक आहे. वॉरंटीचे नियम आणि अटी नीट समजून घ्या.
मोटर पॉवर: चांगल्या पिकअप आणि चढणीवर सहज चालण्यासाठी स्कूटरमध्ये शक्तिशाली 'BLDC' किंवा 'मिड-ड्राइव्ह' मोटर असणे गरजेचे आहे.
बिल्ड क्वालिटी आणि फीचर्स: स्कूटरची बॉडी मजबूत असावी. त्यासोबतच डिजिटल डिस्प्लेसह आधुनिक फीचर्सची तपासणी करा.
ब्रेकिंग सिस्टम आणि सुरक्षितता: प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक्स आणि सीबीएस असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सर्व्हिस सेंटर आणि सुटे भाग: तुम्ही राहता त्या शहरात संबंधित कंपनीचे सर्व्हिस सेंटर आणि स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध आहेत का? याची खात्री करा.
टेस्ट राइड : केवळ जाहिरात पाहून निर्णय घेऊ नका. प्रत्यक्ष टेस्ट राइड घेऊन स्कूटरचा पिकअप, ब्रेकिंग बॅलन्स आणि रायडिंग कम्फर्ट स्वतः तपासून पहा.
किंमत आणि सबसिडी: विविध मॉडेल्सच्या किमतींची तुलना करा. तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या सबसिडी योजनेचा लाभ मिळतो का, हे तपासा ज्यामुळे तुमची मोठी बचत होईल.
IPL मध्ये एका डावात सर्वाधिक सिक्सर मारणारे 'धुरंधर'