५ राशींसाठी आजचा दिवस ठरणार अत्यंत शुभ!

कुणाला मिळणार बढती आणि कुणाच्या पदरी पडणार निराशा? वाचा आजचे राशीभविष्य

मेष- आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. ह्या विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

वृषभ- आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. 

मिथुन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश - कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. 

कर्क- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. 

सिंह- आज कुटुंबातील वातावरण वाद - विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल. 

कन्या- आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्या कडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. 

तूळ- आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक- आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल. 

धनु- उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल. 

मकर- आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर - सट्टा ह्यात धन लाभ होईल. 

कुंभ- आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. 

मीन- आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. 

तू देखण्या रुपाची राणीदिशा पाटनीचा 'देसी' अवतार

Click Here