Join us

Weather:राज्यात थंडीला सुरुवात, आज राज्यात कुठे किती तापमान होते? 

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 10, 2023 4:40 PM

या आठवड्यात वातावरण काेरडे राहणार असून हलक्या थंडीला सुरुवात झाली आहे.

राज्यात आता चांगलाच गारठा वाढू लागला आहे. देशात काही भागात तापमानाचा पारा घसरू लागला आहे. राज्यातील तापमानात आज १ ते २ अंशाने घसरण झाली आहे. उद्गीरमध्ये आज १४.५ अंश सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. काही भागात धूके आणि ढगाळ वातावरण होते. परिणामी, तापमानात घसरण झाल्याचे मिचाँग चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचे हवामान विभागाने सांगितले. 

डिसेंबर महिना उजाडला तरी अजुनी हुडहुडी भरविणाऱ्या थंडीची राज्याला प्रतिक्षा होती. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तात्पूरती थंडी पडली खरी. चक्रीवादळाच्या प्रभावातून बाहेर पडेपर्यंत विस्कळीत वातवरणीय बदलाला सर्वांना तोंड द्यावे लागले. मात्र आता, राज्यात चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार नसून पाऊस थांबला आहे. या आठवड्यात वातावरण काेरडे राहणार असून हलक्या थंडीला सुरुवात झाली आहे. अद्यापही मुंबईसह राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी पडलेली नाही. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या एल-निनोच्या वर्षात थंडीचा पॅटर्न वेगळा जाणवत आहे. मात्र, जर हवामानात बदल झाले तर कदाचित कडाक्याची थंडीदेखील पडू शकते.

राज्यात कोणत्या भागात किती तापमान होते? 

Date: 2023-12-10

Station                                                     

    Max Temp (oC)

Dep. from Normal

Min Temp (oC)

Ahmednagar

28.8 (09/12)

-1

NA

Aurangabad

28.4 (09/12)

-1

15.4

Beed

27.5 (09/12)

-1

15.7

Dahanu

30.9 (09/12)

1

20.1

Harnai

--

--

24.7

Jalgaon

--

--

15.9

Jeur

31.5 (09/12)

0

NA

Kolhapur

30.1 (09/12)

0

19.6

Mahabaleshwar

25.8 (09/12)

1

14.7

Malegaon

--

--

18.4

Mumbai-Colaba

31.0 (09/12)

-2

22.8

Mumbai-Santacruz

33.2 (09/12)

0

21.3

Nanded

29.8 (09/12)

-1

15.8

Nasik

29.0 (09/12)

--

15.3

Osmanabad

--

--

18.0

Panjim

33.9 (09/12)

1

24.6

Panjim-Old Goa

34.7 (09/12)

--

26.0

Parbhani

--

--

15.9

Ratnagiri

34.8 (09/12)

2

23.0

Sangli

30.4 (09/12)

-1

19.3

Satara

30.7 (09/12)

2

17.5

Sholapur

33.0 (09/12)

2

18.6

Udgir

29.0 (09/12)

--

14.5

 

टॅग्स :हवामानतापमानपाऊसचक्रीवादळ