Join us

Weather: आज कसे होते तुमच्या भागात तापमान? जाणून घ्या..

By मुक्ता सरदेशमुख | Updated: January 1, 2024 18:30 IST

देशात किमान तापमान उत्तरेतील राज्यात ६ ते ९ अंशापर्यंत असताना राज्यात मात्र, तापमानाचा पारा वाढला आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ...

देशात किमान तापमान उत्तरेतील राज्यात ६ ते ९ अंशापर्यंत असताना राज्यात मात्र,तापमानाचा पारा वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या दक्षिण अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. येत्या २४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय किमान तापमान  २ ते ३ अंशांची वाढ होणार असून त्यानंतर तापमानावर फारसा परिणाम दिसत नसल्याचे हवामान विभागाने नोंदवले.

कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात ३ ते ६ जानेवारीदरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात ५ व ६ जानेवारीदरम्यान पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, आज नाशिक जिल्ह्यात १६.४ अंश तापमानाची नोंद झाली. कालच्या तापमानाच्या तुलनेत साधारण ३ अंशाने हे तापमान अधिक आहे. तर सामान्य तापमानाच्या तुलनेत हे तापमान ६ अंशाने अधिक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमान १५.२अंश होते. हे सामान्य तापमानाच्या तुलनेत ४ अंशाची वाढ असल्याचे हवामान विभागाने नोंदवले. जळगावात १४.२ अंश तापमानाची नोंद झाली.आज मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी तापमानहोते. तर कमाल तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे.

काय आहे आजचे तापमान?

 

Date: 2024-01-01

Station

Max Temp (oC)

Min Temp (oC)

Ahmednagar

--

12.7

Alibag

--

18.0

Aurangabad

29.4 (31/12)

15.2

Beed

--

15.7

Dahanu

30.1 (31/12)

19.7

Harnai

32.0 (31/12)

22.9

Jalgaon

30.4 (31/12)

14.2

Jeur

--

14.5

Kolhapur

30.6 (31/12)

16.5

Mahabaleshwar

28.6 (31/12)

14.9

Malegaon

29.2 (31/12)

16.4

Mumbai-Colaba

32.8 (31/12)

22.2

Mumbai-Santacruz

34.0 (31/12)

20.4

Nanded

--

16.8

Nasik

31.4 (31/12)

16.4

Osmanabad

--

17.2

Panjim

33.8 (31/12)

21.5

Panjim-Old Goa

--

20.5

Parbhani

29.4 (31/12)

14.9

Ratnagiri

35.6 (31/12)

19.9

Sangli

30.7 (31/12)

15.9

Satara

31.7 (31/12)

13.7

Sholapur

33.2 (31/12)

17.6

TULGA

--

18.3

Udgir

30.9 (31/12)

16.1

दाट धुक्याची शक्यता

उत्तर-पश्चिम व मध्य भारतातील अनेक भागात दाट धुके पडेल, असा  इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. येत्या काही दिवसांत तो पूर्व भारतातही पसरू शकतो. IMD ने रविवारी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या काही भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली होती.काही ठिकाणी हे दाट धुके ४ जानेवारीपर्यंत राहील, असेही सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :तापमानहवामान