Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील पाच दिवस तापमानात होणार वाढ, काय दिला हवमान विभागाने अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 29, 2024 11:18 IST

पावसाचा जोर ओसरू लागला आहे. तापमानात पुढील ५ दिवसात होणार बदल..

राज्यात पावासाचा जोर ओसरू लागला आहे. एकीकडे कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी वाशिम जिल्ह्यात ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. राज्यात पुढील पाच दिवस तापमानात हळूहळू २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

कोकणात उष्णतेची लाट

कोकण किनारपट्टीसह मुंबई व ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत या भागात उष्ण व आर्द्र हवामान राहणार आहे.

मध्य महाराष्ट्र विदर्भ, मराठवाडा विभागात पुढील पाच दिवसात उष्ण तापमान राहणार असून नागरिक वाढत्या उष्णतेने हैराण होत आहे.

टॅग्स :तापमानहवामानवनविभाग