Join us

Monsoon Update: नैऋत्य मोसमी पाऊस कुठवर पोहोचला? महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सून?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: May 23, 2024 15:22 IST

हवामान विभागाने काय सांगितलं, वाचा..

रणरणत्या उन्हाने देशातील नागरिक बेजार झाले आहेत. तापमानाचा पारा वाढत असून नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात कधी बरसणार याची सर्वांना आतूरता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी पाऊस आता बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहोचला असून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातील इतर भागातही लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात अरबी समुद्राच्या काही भागात पावसाला पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागराकडून मध्य पश्चिम दिशेने नैऋत्य मोसमी वारे वाहत आहेत. वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

सध्या देशाच्या कोणत्या भागात सध्या पावसाची शक्यता आहे. जाणून घ्या ..

टॅग्स :मोसमी पाऊसहवामानमोसमी पावसाचा अंदाज