Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rain : आज गौराई पुजेला महाराष्ट्रात कोसळधारा ! जाणून घ्या कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 10:47 IST

मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात निवडक ठिकाणी जोरधार पाऊस कोसळत आहे. आज गौराई-महालक्ष्मीपुजनाच्या दिवशी पावसाची स्थिती अशी आहे.

भारतीय हवामान विभागाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार काल दिनांक २१ सप्टेंबर रोजी पुणे, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या भागातील निवडक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट आहे, तर विदर्भातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी त्यापेक्षाही अति जोरदार पावसाची शक्यता आहे.

Rain: राज्यभर मुसळधार, विदर्भातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाबळेश्वरमध्ये गणेशोत्सव काळात पावसाची संततधार सुरूचगणेशोत्सवात महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार कायम आहे. तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे गणेश आली. मंडळातच बसून विविध पूजापाठ केले जात आहेत. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची तुरळक गर्दी दिसत आहे. तालुक्यातील नदी, नाले, ओढे पुन्हा ओसंडून वाहू लागले आहेत. चार दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे २४ तासांत ७६.०२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, महाबळेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

दोनशे रुपयांना ओरड, दोन रुपयांवर मौन का ? असे आहेत टोमॅटो बाजार भाव

महाबळेश्वरात आजअखेरपर्यंत मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती नगरीकडे वळू लागली आहे. हवामान विभागातून देण्यातगुरूवारी सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार सुरूच असून, महाबळेश्वरमधील अनेक दुकाने पावसामुळे बंद होती. ऐन भेट देतात. गणेशोत्सवात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घरगुती गणपतींच्या पूजेसाठी अनेक विघ्न येत आहेत. तर महाबळेश्वरमध्ये गणेशोत्सव असूनही बाजारपेठेमध्ये पावसामुळे शुकशुकाट होता. 

टॅग्स :पाऊसमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज