Join us

Nar Par Project : नार-पार प्रकल्पासाठी 3801 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन होणार, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:12 IST

Nar Par Project : नार पारसाठी (Nar Par Prakalp) भूसंपादनासाठी तांत्रिक मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जळगाव : नार-पार-गिरणा नदीजोड (Nar Par Girna Project) प्रकल्पाद्वारे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतील ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी ३८०१ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यानुसार तांत्रिक मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्थसंकल्पात ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दमणगंगा-एकदरे-गोदावरी (Godawari Nadi Jod Prakalp) या नदीजोड प्रकल्पामुळे ३.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी २,३०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून ३८०१ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे.

आता त्याची पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याची निविदा काढण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धरणांमधून ९.१९ टीएमसी पाणी उचलून १४.५६ किलोमीटर बोगद्याद्वारे गिरणा नदीपात्रात चणकापूर धरणाच्या बाजूस पाणी सोडण्यात येणार आहे.

नापारचा नियोजित प्रकल्प कसा आहे तर या प्रकल्पासाठी जवळपास ७०१५.२९ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे ९१८ टीएमसी पाण्याची उचल होणार आहे. तसेच १४.५६ किलोमीटरचा बोगदा देखील असणार आहे आणि या प्रकल्पाद्वारे ४९ हजार क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे

भूसंपादनाची प्रक्रियाया प्रकल्पासाठी ३८०१ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यात ९३९ वन, १९०५ शासकीय व २५६ हेक्टर क्षेत्र खासगी असणार आहे. वनविभागाच्या क्षेत्राचे भूसंपादन करताना वनविभागाला अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया बराच कालावधी घेणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीगिरणा नदीजलवाहतूक