Join us

Weather Report : महाराष्ट्रात उन्हाचं स्वरूप ते पावसाची शक्यता आहे काय? जाणून घ्या हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 19:31 IST

महाराष्ट्रात पुढील काही दिवस उन्हाचं स्वरूप आणि पावसाची शक्यता आहे का? हे जाणून घेऊयात..

पश्चिम झंजावाताच्या साखळ्या खंडीत होण्याच्या शक्यतेमुळे ६ महिने संपूर्ण उत्तर भारतात अनुभवलेला पाऊस, तीव्र, हिमवृष्टी व थंडीचा कालावधी तेथे संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण होत आहे. परिणामी परवा, शुक्रवार दि. १५ मार्चपासून महाराष्ट्रातही थंडी कमी होवून कमाल व किमान अशा दोन्हीही तापमानात सरासरीपेक्षा २ डिग्री से. ग्रेडने वाढ होईल. अर्थात एप्रिल ते जून या पूर्वमोसमी तीन महिन्यातही कमकुवत पश्चिम झंजावात कधी-कधी डोकावतातही, असा हवामान अंदाज जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.              महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय?

शेतीचा रब्बी पिकांच्या काढणीच्या गंभीर अवस्थेतील कालावधी सध्या चालु आहे. त्यातही महाराष्ट्रात ' पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता म्हणून बातमी शेतकऱ्यांच्या कानी येऊ शकते. मात्र शेतकऱ्यांनी विचलित होवु नये, असेच वाटते. कारण आजपासुन चार दिवसानंतर विदर्भातील केवळ अमरावती नागपूर गोंदिया व गडचिरोली अश्या ४ जिल्ह्यात दि.१६ ते १९ मार्च (शनिवार ते मंगळवार) दरम्यान अश्या ४ दिवसात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी नकळत किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. तेंव्हा उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील  ३२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरू नये. तेथे वातावरण कोरडेच राहील, असे वाटते.            अवकाळी वातावरण कसे असेल?               अवकाळी पाऊस व गारपीटीच्या हंगामाचा कालावधी अजूनही संपलेला नाही. परंतु खंडीत होत जाणाऱ्या प. झंजावाताच्या साखळ्या अन्  एल- निनोचे वर्ष व मार्चच्या मासिक सरासरीइतकी किंवा मध्यम पर्जन्याची शक्यता, यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीटीची विशेष अशी शक्यता सध्याच्या व येणाऱ्या रब्बी पीक काढणीच्या काळात जाणवणार नाही, असेच वाटते. त्यामुळे फळबागा, कांदा, गहू, हरभरा, ज्वारी सारख्या रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित व निर्धास्तपणे उरकता येईल असे वाटते. अर्थात वातावरणात एकाकी बदलाची काही शक्यता असल्यास अवगत केले जाईलच, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले. 

लेखक जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे, (पुणे आयएमडी)