Join us

किकुलॉजी: एआयचे तंत्र अन् शेतीत पैशांच्या पावसाचा जादूमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 11:04 AM

(किकुलॉजी, भाग १९): शेतकरी बांधवांनी हवामान व तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर.

‘बुद्धिमत्ता’ ही मानवी प्रयत्नांचाच परिपाक आहे. मानवी समुहाच्या मर्यादांवर मात करत 'एआय' (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अविश्वसनीय वाटत आले तरी शेतीउद्योगात पैशांचा 'पाऊस' शक्य आहे, मात्र आपली गरज ओळखून त्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न व‌ कृती आवश्यक आहे.

तंत्रज्ञान जगात शेतकरी अनाडी आहे हे वास्तव आपल्याला बदलावेत लागेल. चंद्र, मंगळ, शुक्र आणि इतर आकाशगंगेतील परग्रहांवर मानवी वस्ती व शेतीसाठी पृथ्वीवर प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी मानवी अस्तित्वासाठी शेतीतून तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने अन्नाची निर्मिती तसेच सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. नैसर्गिक बुद्धिमत्ता (एनआय) वापरून तयार केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) व जेनेटिक इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), मशीन लर्निंग (एमएल), हायपरअॅटोमेशन, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आदींचा समन्वय आवश्यक आहे. 

या विकसित इलेक्ट्रॉनिक्स तंत्राबद्दल शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. सोबतच स्वानुभवाने केलेली शेती आणि शेतीनिगडीत उद्योगधंद्यांसाठी 'पैशाचा पाऊस' म्हणावा अशी सुबत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतरही विकसित इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी यांच्या संगमाने येऊ शकेल. वातावरण बदल होत असतानाच ह्युमन सिव्हीलायझेशन(मानवी सभ्यता)च्या पोटाची व ज्ञानाची भुक भागविण्याचा प्रवास सुरू आहे. अशा वेळी घाबरून न जाता आपण कुठे आहोत याचा शोध आणि बोध घेणे फक्त गरजेचे नव्हे तर अपरिहार्य देखील आहे!

इलेक्ट्रॉनिक्स सर्किट आहे, मानवी शरीर आणि शेतीमेंदू हे दुसरे-तिसरे काही नसून, एक जैविक यंत्रच असल्याचा एक मतप्रवाह आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मानवी शरीरात संदेश वहन हे सूक्ष्म विद्युत प्रवाहाच्या मार्फत होते. थोडक्यात मानवी शरीर हे देखील एक इलेक्ट्रॉनिक्स सर्किट आहे. इतकेच नव्हे तर शेतीतील सर्व अन्नधान्याची पिके आणि वनस्पती हे देखील इलेक्ट्रॉनिक्स सर्किट आहे हे अनेकांना कदाचित माहित नाही. यंत्राला जशा मर्यादा असतात अगदी तशाच मर्यादा मानवास नैसर्गिक उत्क्रांतीला देखील आहेत. मात्र स्वतःचा विकास स्वतःच करावा असे प्रशिक्षण दिलेली यंत्रे ही मानवजातीस उद्या कायमची नष्ट करू शकतील किंवा गुलाम बनवितील असा धोका व्यक्त केला जातो. तर दुसऱ्या मतप्रवाहानुसार मेंदूला यंत्र म्हणू शकत नाही, ती एक गुंतागुंतीची जैविक चेतनादायी निर्मिती आहे. त्यामुळे अचेतन यंत्रांपासून घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. या दोन्ही प्रवाहांमध्ये मतभिन्नता असली तरी मानवी मेंदूकडून मेंदूतील खूप काही अज्ञात गोष्टी शिकण्यासारखे आहे, हे दोघेही मतप्रवाह मान्य करतात. यासाठी विचारांची 'शेती' ही विचारपूर्वक व ठोस कृतीशील पावले उचलत करायला हवी.

किकुलॉजी भाग १८: जूनमधला मॉन्सून मार्चमध्येच? शेतातल्या मातीला धोका चक्रीवादळांचा

काय आहे ’कृत्रिम बुद्धिमत्ता’? ‘कृत्रिम बुद्धिमत्ता‘ म्हणजेच 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' म्हणजेच 'एआय'! सध्या जगातील प्रथम क्रमांकाची टेक्नॉलॉजी  'एआय' असून यात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहे. पण जगभर या क्षेत्रात काम नैसर्गिक बुदधीमत्ता असणाऱ्या  लोकांचा अक्षरश: दुष्काळ आहे.

‘बुद्धिमत्ता’ हा एकमेव असा शब्द आहे की जो मानवाला अन्य सजीवांपासून संपूर्ण ब्रह्मांडात वेगळा ठरवितो. मानवाला लाभलेली नैसर्गिक बुद्धिमत्ता, बौद्धिक क्षमता, अंदाज क्षमता, तर्कशक्ती आणि विश्लेषणाच्या ताकदीवरच जग जिंकणं शक्य झालं आहे. आता तर मानवाने 'नैसर्गिक बुद्धिमत्ते'च्या जोरावर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' जे की 'ए आय' नावाने देखील ओळखले जाते त्याची निर्मिती केली आहे.

माणसाच्या अचाट कल्पनाशक्तीचे आणि सातत्यपूर्ण प्रयोगशीलतेचे 'एआय' हे एक यश होय. १९४३ मध्ये मॅकलॉक आणि पिट्स या संशोधकांनी मेंदूसारखे शिकणाऱ्या चेताजाल तंत्रज्ञानाची (न्युरल नेटवर्क) संकल्पना प्रस्तुत केली. आयझॅक आसिमोव्ह यांनी १९५० मध्ये ‘आय रोबोट’ कादंबरीत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वेध घेतला. त्याच वेळी एलन टुरिंग या संशोधकानं आपल्या ‘कॉम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स’ या पहिल्या शोधप्रबंधामध्ये यंत्राची बौद्धिक कुवत आजमावून पाहणाऱ्या ‘टुरिंग टेस्ट’ची संकल्पना मांडली. जॉन मॅकार्थी यांनी १९५५ मध्ये'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' ही संकल्पना सर्वप्रथम जगासमोर मांडली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळण्यासाठी १९५६ पर्यंत थांबावं लागलं. ‘डार्टमाऊथ कॉन्फरन्स’मध्ये जगभरातील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला. ‘आयबीएम’ने तयार केलेल्या ‘डीप ब्ल्यू’ कॉम्प्युटरनं १९९० मध्ये जागतिक कीर्तीचा बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला पराभूत केल्यानंतर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता‘ (एआय)  तंत्रज्ञानाची ताकद दिसून आली.

मानवी भूक! जगाची लोकसंख्या ८ अब्ज झाली आहे, मात्र यातील एक तृतीयांश लोक रोज उपाशी झोपतात. अशावेळी समुह शेतीने विषमुक्त अन्नधान्य उत्पादन कसे करता येईल हे समजून ठोस निर्णय व कृती आवश्यक आहे. भारतातील १.४ अब्ज जनतेची भूक भागविण्यासाठी केवळ देशाच्या क्षेत्रफळाच्या ४३ टक्के कृषी भूमी आहे व ते बांधकामे व पैशाचा हव्यास यामुळे कमी होतेय. जगाच्या कल्याणासाठी अन्नसुरक्षेसह गुन्हेगारी नियंत्रणाची फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आणि इंटरपोलने देखील हे अधोरेखित केले आहे.येत्या काळात 'नेशन फर्स्ट'साठी शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, भाकरी इंटरनेट वरून डाऊनलोड करता येत नाही हे वास्तव व सत्य आहे.

जादूगार 'एआय'! लॅब मध्ये चिकन मटनासारखी चव असलेले पदार्थ व कृत्रिम मांस बनविण्याचे प्रयोग हे आता प्रयोगशाळेतील कृत्रिम गर्भात जेनेटिक इंजिनियरीय, एआय, इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेयर, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), मशीन लर्निंग (एमएल), स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करणारे हायपरअॅटोमेशन, माहितीत कुठल्या ठिकाणी कोणी व कसे बदल केले याची अचूक नोंद ठेवणारी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आदी सर्वांचे सिंक्रोनायझेशन किंवा मिलाफ हवी तशी मानवी बाळे डिझाइन व मॅन्यूफॅक्चर करण्याचे प्रयत्न इक्टोलाईफ सारख्या संस्था यशस्वी करून दाखवित आहेत.

शेतीसाठी तंत्रज्ञान साहजिकच लवकरच आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करणारा शेतकरी तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रयोग करीत शेती ही शाळा बनवू शकेल. शेतकऱ्यांच्या मुलांनी एआय, आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज), एमएल (मशीन लर्निंग), हायपर ऑटोमेशन, फुल स्टॅक डेव्हलपमेंट आदी तंत्रज्ञानासोबतच 'टिमवर्क'ने उद्योग व्यवस्थापन करने ही काळाची अपरिहार्य आहे. पृथ्वीवर व इतर ग्रहांवर देखील मानवी सभ्यतेच्या अस्तित्वासाठी अन्न नासाडी टाळत सुयोग्य अन्न प्रक्रिया व अन्न साठवणूक 'एआय'ने शक्य होईल. 'एआय'च्या सुयोग्य वापराने शेती व देशातील प्रत्येक प्रॉब्लेमवर 'ओन्ली सोल्यूशन्स' मिळेल. आज सुमारे ३.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था ५ नव्हे तर १० ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य देखील 'एआय'ने गाठू शकतो.

येत्या काळात अल्गोरीदम कोड लिहीणाऱ्यांचा व डाटा सायन्स (डीएस) वर काम करणाऱ्यांचा दुष्काळ अधिक तीव्र झालेला असेल. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' असलेले संगणक आणि यंत्रमानव मानवाशीच स्पर्धा करु लागले आहेत.

जीवन बदलतेय नखशिखांत 'ए आय' ने मानवी भावभावना जाणून घेणारे यंत्रमानव म्हणजे रोबोट तयार झाले आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ने रोबोट एँकर आज बातम्या देऊ लागले आहेत. नागपूरला हॉटेल मध्ये वेटर रोबोट आले आहेत. बंगलोर व मुंबईत रोबोट टीचर आले आहेत. अमेरीकेत विदयापीठ व कॉलेजमध्ये शिकविण्यासाठी प्राध्यापक म्हणून रोबोटला अॅक्रीडेशन (मान्यता) मिळाली आहे. त्यामुळे कौशल्य विकास व सृजनशीलता यावर लक्ष केंद्रीत करता येईल हा विचार पुढे येत आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी सरकारी कामकाजासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' चा वापर करत चक्क सनदी अधिकाऱ्यांच्या दोन रॅंक (श्रेणी) रद्द करीत आहे. उद्या राजकिय पक्षांनी आपले 'ए आय' रोबोट निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे केलेत, तर नवल वाटायला नको कारण 'ए आय को रोखना मुश्किल ही नहीं, बल्की नामुमकिन है'!

पैशाच्या शेतीचे बिझनेस सिक्रेट!कृषी क्षेत्रात प्रत्यक्ष भरीव कृती आराखडा बनवू इच्छिणाऱ्या सर्वांनी 'एआय व शेती' यांची सांगड घालत राष्ट्र उभारणीत आपली भुमिका कशी निभावतील या विषयी एखादा खजिना हाती लागावा असे समाधान आर्टिफिशियल इंटेलिजेन्स ('एआय) तंत्रज्ञानाच्या अद्भूत दुनियेच्या सफरमध्ये सर्वांना मिळू शकते हे विशेष!

व्याप्ती आणि प्राप्ती!भारतातील शेतजमीन क्षेत्र १५९.७ दशलक्ष हेक्टर आहे. अमेरिकेनंतर जगातील हे दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे शेतीक्षेत्र आहे. ८२.६ दशलक्ष हेक्टर इतके सिंचनाखाली भारतीय शेती हे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे. पावसामुळे महाराष्ट्रातील सुमारे ५४.२२ लाख हेक्टर वरील खरीप पिके उद्ध्वस्त झाल्याची आकडेवारी सांगते. मान्सून पॅटर्न बदलात तग घेत, कमी कालावधीमध्ये काढणीस येणाऱ्या, ढगफुटींमध्ये आणि दुष्काळामध्ये तग धरू शकतील अशा देशी बी-बियाणांच्या जाती तंत्रज्ञानाने विकसित करणे काळाची गरज आहे.

माहितीच्या महाजालात म्हणजे इंटरनेट आणि सॉफ्टवेअरला 'स्मार्ट डिसीजन सपोर्ट सिस्टीम' म्हणून केवळ शेती व शेती संलग्न उदयोगधंदेच नव्हे तर हवामान आणि अवकाशशास्त्र, वाहन उद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, वीजनिर्मिती, दळणवळण, हवाई वाहतूक, बंदरामध्ये जहाजांची ये-जा देखरेखीसाठी, खाणकामात, खते, कीटकनाशके, बी बियाणे निर्माण, औषध निर्मिती आदी प्रत्येक क्षेत्रात 'एआय' (कृत्रिम बुद्धिमते)चा उपयोग होत आहे. बिझनेस मध्ये 'एआय' वापरतांना नितीशास्त्र म्हणजे 'इथिक्स' आणि आत्मसमाधान देणारी 'मॉरेलिटी' महत्वाची आहे व ही एआय शिकवू शकत नाही ही मर्यादा आहे. 'एआय'ने शिक्षण क्षेत्रात घडतील व क्रांतीकारी बदल  उद्योग व्यवसायात ही सुमधूर फळे देईल. हवामान बदल, सेंद्रीय खते, माती परीक्षण, कीटकनाशके, देशी बी-बियाणे, सकस अन्न व भाजीपाला तसेच दुग्धव्यवसाय आदींच्या बिझनेस मॉड्यूल व मॉडेल मध्ये एआय वापर कसा करणे प्रत्यक्ष फायदेशीर आहे.

भुक मिटविणारी चिप मेंदूत बसविणे बाकी!थेट मेंदूत बसविता येणारी इंटिग्रेटेड सिलिकॉन चिप (आयसी) ओपन एआय, टेस्ला मोटर्स, स्पेस एक्स, स्टारलिंक आणि सोलर सिटी आदी कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी एलॉन मस्क यांनी बनवली आहे. मात्र असे झाले तरी पोटाची भुक यातून मिटेल अशी शक्यता सध्यातरी दिसत नाही. परिणामी मेंदूतील सर्वकाही अनुभव व अनुभूती यापुढे शेतकरी व सर्वसामान्य जन संगणकावर डाऊनलोड करून निर्धास्तपणे अमरत्व देखील प्राप्त करता येऊ शकेल हे आजचे वास्तव आहे. भुक मिटविणारी चिप तयार होणे व मेंदूत बसविणे अद्याप बाकी आहे. पद्धतशीर कृतीने सुयोग्य  निर्णय घेत वापर केल्यास 'एआय' तंत्र हे शेतीत पैशांच्या 'पाऊसा'चा जादूमंत्र आहे.

-प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक, ढगफुटी तज्ज्ञ,के.टी.एच.एम.कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिकसंपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com

टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशेती क्षेत्रशेतीशेतकरी