Join us

Jayakwadi Dam: जायकवाडी धरण १० टक्क्यांच्याही खाली, किती आहे धरणसाठा?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 04, 2024 10:37 AM

मागील वर्षी जायकवाडी धरणात ५२.३६ टक्के पाणीसाठा होता. तो आता एवढा राहिलाय..

मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचापाणीसाठा दहा टक्क्यांच्याही खाली गेले आहे. पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. मेच्या सुरुवातीला तो आता केवळ ७.९७ टक्के पाणी शिल्लक राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.

वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. याशिवाय शेती व पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी उपसले जाणारे पाणी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी होणारा उपसा अशा वेगवेगळ्या कारणांनी पाणी वापरले जात आहे.

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आता टँकर सुरु झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठीचा खंड आठवड्यावर जाऊन पोहोचला आहे. वेगवेगळ्या जलाशयांमधून उपसल्या जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध घालण्यात येत आहेत.

दरम्यान जायकवाडी धरणात आज सकाळी ८.०० वाजता ६.०७ टीएमसी पाणी शिल्लक होते. मागील वर्षी याच दरम्यान हा पाणीसाठा ५२ . ३६ टक्के होता. तो आता ७.९७ टक्के एवढा आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांना पाण्याची वाट पहावी लागत आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीधरण