Join us

पुण्यासह या सहा जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटांचा इशारा, ११ जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, वाचा सविस्तर

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 23, 2024 9:36 AM

हवामान विभागाचा सविस्तर अंदाज वाचा एका क्लिकवर..

राज्यात एकीकडे वादळी वाऱ्यांचा पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज पुण्यासह सहा जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागणार आहे. तर विदर्भात वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यासह लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या चक्राकार वारे वायव्य इशान्य राजस्थान आणि पश्चिम विदर्भावर सक्रीय आहेत. परिणामी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. २३ ते २६ मेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज विदर्भात तर २३ ते २५ पर्यंत मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचा इशाराही देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा भडका

उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा भडका उडाला असून नागरिकांना प्रचंड उकाड्यासह घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. धुळे, नंदूरबार जिल्ह्यात ४५ अंशांपर्यंत तापमान पोहोचत असून जळगावातही तापमान असह्य झाले आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट?

आज पुण्यासह नाशिक, अहमदनगर, अकोला, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा उच्चांक राहणार असून उष्णतेच्या लाटांचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :हवामानपाऊसतापमानमोसमी पावसाचा अंदाज