Join us

Heat wave alert: आज राज्यात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 27, 2024 11:05 AM

या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, वाचा सविस्तर अंदाज

राज्यात नागरिक उष्णतेच्या झळांनी हैराण झाले असून काल राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज राज्यातील ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे,जळगाव, हिंगोली, नांदेड, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

आज कोल्हापूरात ३३.२, मुंबई ३५.४, पुणे ३५.८, सांगली ३४.४, सिंधुदूर्ग ३४.६ अंश तापमान राहण्याची शक्यता आहे.

पहा हवामान विभागाने दिलेला इशारा

दरम्यान रविवारी अकोल्यात ४५.६ अंश तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४२.८ अंश तापमान होते. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात काल प्रचंड उकाडा आणि उष्मा जाणवला.

टॅग्स :तापमानहवामानपाऊस