Join us

Dam water Storage: लातूर, धाराशिवच्या बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर! जाणून घ्या

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 04, 2024 11:43 AM

तापमानाचा पारा वाढला असून धरणसाठ्यात बाष्पीभवन वाढले आहे.

मराठवाड्यात तापमानाचा  पारा चाळीस अंशांच्या पुढे जात असून लातूर आणि धाराशिवच्या बहुतांश धरणांमध्ये शुन्यावर पाणीसाठा गेला आहे. परिणामी, नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

धाराशिवच्या सर्वात मोठ्या सिना कोळेगाव धरणात शुन्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून निम्न तेरणा धरणात केवळ ३.४५ टक्के पाणी शिल्लक आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा होणाऱ्या उजनी धरण मायनसमध्ये गेले आहे.

लातूरच्या धरणांमध्येही पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. शिवनी धरणात  शुन्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी हा साठा ३४.६० टक्क्यांवर गेला होता. तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे जलसाठ्यांमधला पाणसाठ्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे.

टॅग्स :धरणलातूरउस्मानाबादपाणी