Join us

थंडीची चाहूल अन् विदेशी पाहुण्यांचा जलाशयांवर किलबिलाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 7:16 PM

सरोवरांवर पक्ष्यांचा किलबिलाट, पक्षी निरिक्षकांसाठी पर्वणी, नोव्हेंबर ते मार्चपर्यंत असतो मुक्काम..

थंडीची चाहूल लागताच खाडीकिनारी विदेशी स्थलांतरित पक्षी दरवर्षी हजेरी लावतात, यावर्षी थंडीला सुरुवात झाली असून, पक्ष्यांचे आगमन सुरू झाल्याने पक्षीमित्रांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील खारघरसह पुण्याच्या उजनी जलाशयावर पक्ष्यांचे विलोभनिय दृश्य पहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सलिम अलि सरोवरावरही विदेशी पक्ष्यांचे थवे थांबले असून पक्षी निरिक्षकांसाठी ही पर्वणी आहे.

खारघरमध्ये सेक्टर १६, १७, २५, २७, १०, ८ आदी खाडीकिनारी परिसरात या पक्ष्यांचे विलोभनीय दृश्य पाहावयास मिळत आहे. रशिया, सायबेरिया आणि मध्य आशियामधून स्थलातरित पक्ष्यांचे आगमन झाले असून, खाडीकिनाऱ्यावर किलबिलाट वाढल्यामुळे पक्षिप्रेमीसाठी ही पर्वणी समजली जात आहे.

खारघरमध्ये पक्ष्यांचा वर्षभर वावर

शहरात वर्षभर येणाऱ्या पक्ष्यांमध्ये सँडपायपर्स, रोहित, सारस चगळे, रेड चुलबुल, गुलाबी स्टारलिंग, कॉमन किंगफिशर, पॅसिफिक गोल्डन प्लेव्हर, सॅन्डपीपर, चिमणी, घार, गरुड, किंगफिशर, उघड चोच करकोचा, रंगीत करकोचा, हुदहुद्या, तुताया, घार, खंड्या, बगळे, राखी चगळे, लाजरी, पाणकोंबडी आदीचा समावेश आहे. त्यामुळे या पक्ष्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. शासनाने याठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांसाठी जागा आरक्षित करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे.

शहरात दुर्मीळ पक्षी थंडीची चाहूल लागताच दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यामधील आठ प्रजातींचे पक्षी अत्यंत दुर्मीळ आहेत. त्यामुळे या पक्ष्यांच्या संवर्धनाची गरज असून, त्यांची घटती संख्या ही गंभीर बाब आहे. यामुळे अन्नसाखळी धोक्यात येऊ शकते. त्याचे परिणाम मानवी आरोग्यावर पडण्याची शक्यता आहे. ज्योती नाहकणी, पक्षीप्रेमी आणि अभ्यासक, खारघर

रेडनेक आयबीस, ब्लॅकटेल आदीचा समावेश आहे. हिवाळ्यात देशी-विदेशी प्रजातीचे सुमारे १८० प्रजातीचे धये याठिकाणी येत असतात. यापैकी ८ प्रजातीचे पक्षी अति दुर्मीळ असल्याचे पक्षीमित्र आणि अभ्यासक ज्योती नाडकर्णी सांगतात.

एकीकडे सिमेंटचे जंगल आणि दुसरीकडे निसर्गसंपदेने नटलेले शहर अशी खारघर शहराची ख्याती आहे. यामुळेच खारघर शहराला रहिवाशांची सर्वाधिक पसंती लाभत आहे. मेद्रो सुरु झाल्याने खारघर शहर परिपूर्ण शहर झाली असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :हवामानतापमानपक्षी अभयारण्य