Join us

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना  

By मुक्ता सरदेशमुख | Updated: July 19, 2023 20:44 IST

एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत.

राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिले. आज विधानभवन परिसरात  माध्यमांशी बोलत होते. 

नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहनही त्यांनी केले. 

काय म्हणाले शिंदे?

सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमोसमी पाऊसविधानसभा