Join us

कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 17, 2023 5:00 PM

राज्यात सध्या ऑक्टोबर हीट वाढत आहे. अनेक भागात हवामान कोरडे आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे.दरम्यान हवामान विभागाने ...

राज्यात सध्या ऑक्टोबर हीट वाढत आहे. अनेक भागात हवामान कोरडे आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे.दरम्यान हवामान विभागाने कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातून पाऊस परतला असून चक्राकार वाऱ्याची स्थिती अरबी समुद्रावर कायम असल्याने कोकणात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज कोकणात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ४५ किमी प्रतितास राहणार असून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.किनारपट्टी मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सात दिवस कसे राहणार तापमान

राज्यात येत्या दोन दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील दोन दिवस किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज