Join us

औष्णिक विद्यूतला सोडल्यानंतर आता जायकवाडी धरणात उरलंय एवढं पाणी...

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 20, 2024 9:44 AM

जायकवाडीत आज दिनांक २० मार्च रोजी...

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातून परळीच्या औष्णिक विद्यूत प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत असून आता जायकवाडीत आज दिनांक २० मार्च रोजी केवळ २३. ७३ टक्के पाणीसाठा उरला आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जायकवाडी धरणात आज सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ५१५.१५ दलघमी म्हणजेच १८.१९० टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास १०० क्यूसेकने पाणी सोडण्यास आले. टप्प्याटप्प्याने पाण्याचा वेग वाढवला जाणार असून जवळजवळ २० दलघमी पाणी खडका बंधाऱ्यात १ एप्रिलपर्यंत सोडण्यात येणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी २ एप्रिलपासून डाव्या कालव्याचे रोटेशन सुरू करणार असून, यामुळे पशुधन जगवण्यासाठी मदत होईल. उजव्या कालव्याचे नियोजन अद्याप झालेले नाही, मात्र एप्रिलमध्ये उजव्या कालव्यालाही पाणी सोडणार असून, यामुळे पशुधन जगवण्यासाठी मदत होईल, असे कार्यकारी अभियंता जाधव यांनी सांगितले.

नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे पाणी, शेती तसेच औद्योगीक तसेच महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल ४०० गावांची तहान जायकवाडी धरण भागवते. तसेच परळीतील वीजनिर्मिती थर्मल प्रकल्पसुध्दा याच पाण्यावर अवलंबून आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीमराठवाडा