Join us

मराठवाड्यात स्ट्रॉबेरीचा अफलातून प्रयोग! दहा गुंठ्यात केली पाच लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 12:46 PM

कॅलिफोर्नियाची स्ट्रॉबेरी आता नांदेडच्या मातीत

श्रीनिवास भोसले, नांदेड

बाजारात जे विकलं तेच पिकवलं पाहिजे, अन् ते पिकविण्याची जिद्द उराशी बाळगून मुदखेड तालुक्यातील एका सुशिक्षित युवा शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी लागवडीचा अफलातून प्रयोग यशस्वी केला आहे. मागील तीन वर्षांपासून तो लालभडक स्ट्रॉबेरी यशस्वी शेती करतोय, यंदा त्याने सातासमुद्रापार पिकणारी विंटर डाऊन जातीच्या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतले आहे. त्यासाठी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून त्याने मातृवृक्ष मागविले होते. त्यापासून तयार केलेल्या रोपांची वाढ होऊन आता फळधारणा झाली आहे. दिसायला लालभडक अन् खायला आंबटगोड स्ट्रॉबेरीला ग्राहकही पसंती देत आहेत.

काश्मीर, महाबळेश्वरचं काय? नांदेडातही स्ट्रॉबेरी

भारतात स्ट्रॉबेरीची शेती काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या वरच्या भागात केली जाते. डोंगराळ आणि थंड भागात लागवड केली जाते. जास्त पाणी अन तापमानात स्ट्रॉबेरी पिकू शकत नाहीं, त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणीच सदर पीक घेतले जाते.

महाराष्ट्रात प्रामुख्याने महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतले जाते. परंतु, बारडच्या युवा शेतकऱ्यांने त्याचे कौशल्य वापरून स्ट्रॉबेरीचा शेतकरी ते थेट ग्राहक विक्री प्रयोग यशस्वी केला. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन यंदा त्यांनी ३५ अंश सेल्सिअस तापमानातही रोपं जगू शकतील, अशा वाणाची निवड करून त्याची लागवड केली आहे.

बालाजी उपवार आणि त्यांच्या कुटुंबाचा उदनिवाह पूर्णपणे शेतीवर आहे. बालाजी यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करताना सेंदिव पद्धतीने उत्पादन घेतले. अमिनीचा पोत टिकण्यासाठी ताक, अंडीचे मिश्रण यांसह लेंडी, शेणखत आदींचा वापर केला जातो. जीवमूत, दशपर्णी अर्क आणि गोमुत्राद्वारे फवारणी, वेस्ट ही कंपोजचा वापर केला जातो.

अहोरात्र परिश्रम घेऊन पिकविलेल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. त्यात दलाल, व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांचे आर्थिक सोशन केले जाते. मात्र, बालाजी उपवार यांनी शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना राबविली. आपल्या शेतात पिकविलेली स्ट्रॉबेरी शेताजवळून गेलेल्या हायवेवर स्टॉल लावून विक्री केली जाते. पहाटे तोडणी करून दुपारपर्यंत संपूर्ण ताजी स्ट्रॉबेरी ५०० ग्रॅम, २५० ग्रॅमच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून विकली जाते.

मातृवृक्षापासून रोपं तयार केली

मागील तीन वर्षापासून थोड्या थोड्या प्रमाणात लागवड करत यंदा त्यात वाढ करून २५ गुक्यात कैलिफोर्निया (अमेरिका) येथून भागविलेल्याविंटर डाऊन वाणाच्या स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. गतवर्षी त्यांनी नेदरलँडमधून मागविलेल्या मातृवृक्षापासून रोप तयार करून दहा गुंठ्यात तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेतले होते. चंदा पंधरा गुंठ्यात दहा लाखांचे उत्पन्न घेण्याचे लक्ष असल्याचे प्रयोगशील युवा शेतकरी बालाजी उपचार मोठ्या विश्वासाने सांगतात.

पारंपारिक शेतीला फाटा

या परिसरात प्रकल्पाचे पाणी येत असल्याने विहीर, बोअरला बारा महिने पाणी राहते. त्यामुळे परिसरातील शेतकरी केळी, ऊस, हळद, पपई अशा पिकांना प्राधान्य देतात. इसापूरस बारड येथील कृषीमध्ये पटठीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या बालाजी मारोतीअप्पा उपवार यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकेतची जोड दिली. तसेच धाडस अन् अभ्यासातून स्ट्रॉबेरी शेतीवा प्रयोग यशस्वी केला.

तीन जिल्हातील बहुतांश शेतकरी नावीण्यपूर्ण प्रयोगातून शेती करतात. त्यात इतर भागात पिकणाऱ्या ड्रॅगन फुट, शिमला मिरची यांसह विविध फुलांच्या सेतीबरोबर आता उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण पीक असलेल्या स्ट्रॉबेरी पिकाचाही प्रयोग सुरु झाला आहे.

टॅग्स :नांदेडशेतीहवामान