Join us

75 हेक्टरवर डाळींब उत्पादन, चारशे जणांना रोजगार, मालेगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 4:39 PM

मालेगाव तालुक्यातील ऊसतोड मजूर शेतकऱ्याचा निर्यात झालेला डाळिंब आता सातासमुद्रापार पोहचला आहे. 

मालेगाव : महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक पट्टा म्हणून ख्याती असलेला कसमादे भागातील कळवण, सटाणा, देवळासह मालेगाव तालुक्याची ओळख आहे. याच तालुक्यातील सातमाने ऊसतोड कामगार असलेल्या शेतकऱ्याला कृषी विभागाची संजीवनी मिळाल्याने डाळिंबाची लागवड केली. काही वर्षातच निर्यात झालेला डाळिंब आता सातासमुद्रापार पोहचला आहे. 

मालेगाव तालुक्यात मुख्यतः कांदा आणि डाळींबाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु कांदा लागवडीसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता अधिक असल्याने सातमाने येथील शेतकरी जाधव कुटुंबाला उदरनिर्वाह भागविण्यासाठी ऊसतोड करावी लागत होती. शेतकरी पवार यांना कृषी विभागाकडून मिळालेल्या योजनेच्या माहितीने आयुष्याला नवी दिशा मिळाल्याने सुरुवातीला एका एकरात 250 डाळिंब रोपांची लागवड केली. कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळाल्याने सद्यस्थितीत 75 एकरांतून डाळींबाचे उत्पादन घेत आहेत.

कांद्याला केळीचा पर्याय, लासलगावच्या शेतकऱ्याची कमाल

पाण्याच्या योग्य नियोजनाने येते दर्जेदार उत्पादन

दुष्काळी परिस्थिती आणि डाळिग्रावरील अतिशय नुकसानकारक तेल्या रोगचा यशस्वीपणे सामना करत शेतकरी जाधव कुटुंबीय दर्जेदार आणि निर्यातक्षम डाळियाचे उत्पादन घेत आहे. त्यामुळे निर्यात झालेला माल केवळ नासिक जिल्‌ह्यात नरहे तर रशिया, दुबई, चायनर, बांग्लादेश, मलेशिया आदी देशात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी रवाना केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या डाळिंबाला जागेवरच 120 रुपये पेक्षा अधिक किलोपर्यंत भाव मिळाला असून पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि बागेचे देखील प्रत्येक अंगाने व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे त्यानी दर्जेदार असे उत्पादन मिळवले आहे.

चारशेपेक्षा अधिक जणांना रोजगार उपलब्ध

सातमाने येथील रवींद्र पवार यांनी सुरुवातीला एक हेक्टर क्षेत्रात डाळिंब लागवड केली होती. सद्यस्थितीत 75 हेक्टरवर डाळिंब उत्पादन घेतले जात आहे. त्यापोटी त्यांना 3 ते 4  कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. एकेकाळी ऊसतोड कामगाराचे कुटुंब असलेले पवार यांनी चारशे पेक्षा अधिक जणांना शेतात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेतातील नर्सरीतून परिसरातील शेतकऱ्यांना डाळिंबाची दर्जेदार रोपे पुरवित असल्याचे नीलेश पवार यांनी सांगितले.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकमालेगांवफलोत्पादनडाळिंब