- कौसर खान
Motyachi Sheti : गोदावरीच्या सुपीक काठावर फक्त कापूस, मिरची आणि धानच नाही, तर गोड्या पाण्यात मोतीचीही (Pearl farming) शेती केली जात आहे. जिल्हा मुख्यालयापासून २२० किमी अंतरावरील सिरोंचा येथे रवी बोंगोनी हे गत तीन वर्षापासून मोत्याची शेती करीत असून, त्यांना यातून आर्थिक उत्पादनही मिळत आहे.
केवळ पारंपरिक शेती न कसता अधिक उत्पादन घेणारी शेती कसावी यासाठी बोंगोनी यांनी मोती संवर्धन करण्याचा पर्याय निवडला. यासाठी शेतातील ०.२० हेक्टर आर. जागेवरील खड्डा खणून त्यात त्यांनी मोतीसंवर्धन केले. रवी यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलून मोती संवर्धन सुरू केले. पहिल्या वर्षी त्यांना ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
शिंपल्यांची खरेदी, जाळे, यासह विविध वस्तूंवर त्यांना खर्च आला. १५ ते १६ महिन्यांत त्यांना दुप्पट उत्पादन मिळाले. कंपनीच्या प्रतिनिधींना पैसे दिले गेले तर ते मोती लागवडीसाठी आवश्यक असलेले सर्व मोती, जाळी इत्यादी पुरवतात. कंपनीचे प्रतिनिधी अनेकदा मोती लागवडीच्या पद्धतीचा आढावा घेतात आणि शेतकऱ्यांना आवश्यक सल्ला आणि सूचना देतात. एकदा पीक हातात आले की ते ते खरेदी करतात.
मोती संवर्धनासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेलागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत नेहमीच ८ फूट पाणी असले पाहिजे. पाण्यातील चढ-उतार जाणून घेण्यासाठी त्यांनी ८ फूट उंचीवर पाण्याच्या बाटल्या बसवल्या आहेत. नळीच्या मदतीने मोती संवर्धनाची प्रक्रिया जाणतात.
भुवनेश्वर येथे घेतले प्रशिक्षणरवी बोंगोनीवार यांनी भुवनेश्वर येथील भारतीय कृषी संशोधन परिषद -गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केंद्रीय संस्था (आयसीएआर- सीआयएफए) येथे प्रशिक्षण घेतले. येथे ते मत्स्यपालनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तेथेच त्यांनी मोती संवर्धनाचे प्रशिक्षण घेतले.
मत्स्यपालनाचीही जोडरवी बोंगोनी यांनी मोतीसंवर्धनासाठी तयार केलेल्या खड्यात मत्स्यपालनही सुरू केले आहे. येथे ते मासेपालन करून त्यातूनही उत्पादन घेतात. यामुळे त्यांना एकाच ठिकाणाहून दुहेरी नफा प्राप्त करता येत आहे.