नाशिक :कळवण तालुक्यातील नवी बेज येथील माजी सैनिक तथा प्रगतिशील शेतकरी शांताराम काशिराम पवार यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीत पारंपरिक शेतीला फाटा देत जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करून 'सदाबहार तायवान पिंक' जातीच्या पेरूची फळबाग उभारली आहे.
लागवडीनंतर अवघ्या एका वर्षातच उत्पादन सुरू झाले असून कमी खर्चात भरघोस उत्पन्न घेण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. पेरू फळबागेत त्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. खरीप हंगामात सोयाबीन तर रब्बी हंगामात खरबुजाची लागवड करून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. सदाबहार तायवान पिंक पेरूला सुमारे पंचवीस वर्षे उत्पादनाची हमी असून फवारणी व इतर खर्च अत्यंत कमी येतो.
एक एकरात हजार रोपे, २५ टन उत्पादनमाजी सैनिक शांताराम पवार यांनी एक एकर शेतजमिनीत एक हजार तायवान पिंक पेरूची रोपे प्रत्येकी ३० रुपयांप्रमाणे लागवड केली. प्रारंभी उन्हाळी कांद्याचे आंतरपीक घेत दीडशे क्विंटल उत्पादन मिळवून सुमारे एक लाख रुपयांची कांदा विक्री केली.
पेरू पिकासाठी खत, मशागत व ठिबक सिंचन यासाठी वर्षभरात सुमारे १० हजार रुपये खर्च आला. एका वर्षात त्यांनी सुमारे २५ टन पेरू उत्पादन घेतले. बांधावर वीस आंबा रोपे, वीस सफरचंद व वीस शेवगा असे बांधावरील झाडांपासून उत्पादन घेतले आहे.
तायवान पिंक पेरू बारमाही येत असल्याने उन्हाळा व हिवाळ्यात चांगला बाजारभाव मिळतो. आतापर्यंत त्यांना १० रुपयांपासून ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. पावसाळ्यात दर कमी मिळत असला तरी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित फळांना व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करतात.- शांताराम पवार, माजी सैनिक, नवी बेज
Web Summary : Ex-serviceman Shantaram Pawar earns handsomely growing Taiwan guavas organically. He planted 1000 trees per acre, yielding 25 tons annually, using intercropping for extra income. Low costs and high yields ensure profitability.
Web Summary : पूर्व सैनिक शांताराम पवार जैविक रूप से ताइवान अमरूद उगाकर अच्छी कमाई कर रहे हैं। उन्होंने प्रति एकड़ 1000 पेड़ लगाए, जिससे सालाना 25 टन उपज प्राप्त होती है, अतिरिक्त आय के लिए अंतरफसल का उपयोग किया जाता है। कम लागत और उच्च उपज लाभ सुनिश्चित करती है।