Join us

कॉलेजच्या नोकरीला रामराम ठोकला, आता पिंपळगावला करतात फायद्याची फळशेती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 9:10 AM

फळबागेतून आर्थिक उन्नती साधलेल्या निफाड तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याची ही यशोगाथा…!

गणेश शेवरे

आता शेतीमध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवीन प्रयोग करणाचे दिवस आले असून, शेतकऱ्यांना प्रयोगशिल शेतकऱ्यांचे वेळावेळी मार्गदरर्शन घेणे काळाची गरज बनले आहे. ‘एकमेका साह्य करून अवघे धरू सुपंथ’ याप्रमाणे शेतकऱ्यांनी धुऱ्या-बांधावरुन भांडण-तंटे न करता, शिवारफेरी मारायला हवी. जगात कृषिक्षेत्रात होणारे बदल लक्षात घेत आपल्या पिक पद्धतीत बदल केले पाहीजेत. तरच शेतकरी बदलत्या जगाला सामोरे जावू शकेल, असा विश्वास त्यांच्यात निर्माण करणे आवश्यक झाले असून, शेतकऱ्यांनी प्रयोगशिल शेतकऱ्यांना, त्यांच्या प्रयोगांना आणि कृषिप्रदर्शनांना भेटी दिल्या पाहीजेत. फळबागेतून आर्थिक उन्नती साधलेल्या अशाच एका प्रयोगशिल शेतकऱ्याची ही यशोगाथा…!

मागील अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. राज्यात प्रामुख्याने मोसंबी, डाळिंब, केळी, पेरु यासारख्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील प्रयोगशील शेतकरी भरत बोलीज यांनी फळबागेतून आपली आर्थिक उन्नती साधली आहे. बोलीज यांना पेरु, बोर, केळी, संत्रीची शेती मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरली आहे. कारण संपूर्ण शेतात त्यांनी ऑरगॅनिक शेती व बारमाही उत्पन्न देणारी फळबाग शेती तयार केली आहेआणि त्यातून आपली आर्थिक उन्नती देखील साधली आहे.

पाच बिघे क्षेत्र असलेले भरत बोलीज हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला होते. वडिलांनी पाच बिगे क्षेत्रात द्राक्ष बाग लागवड केली होती. मात्र औषधांचा मोठ्या प्रमाणात खर्च करून निसर्गाच्या हाणीने व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने द्राक्ष विकण्याची वेळ यायची आणि त्यात व्यापारी पळून गेला की .! होत्याच नव्हतं व्हायचं, त्यामुळे स्वतः एमएससी केमिस्ट्री नेट सेट पास असूनही शेतीशी नाळ जुळवून असल्याने भरत यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १२ वर्षापासून कार्यरत असलेल्या नोकरीला जय महाराष्ट्र करत निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील पाच बिगेत असलेल्या द्राक्ष शेतीत बद्दल करून विविध प्रजातीची फळ बाग तयार केली. जवळपास वर्षाला १५ ते २० लाखाचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. स्वतः च शेतात राबवून मजुरीची वाचली. तर ऑरगॅनिक शेती असल्याने मोठी मागणी वाढली व रोख व्यवहाराने फसवणूक देखील टळली. त्यामुळे पारंपारिक शेतीला फाटा देवून त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

चाळीसहून अधिक प्रकारची फळशेती 

शेतकरी भरत बोलीज यांच्याकडे असलेल्या पाच बीगे शेतीत त्यांनी तैवान जातीचे पेरूची बाग, अँना जातीचे शिमला वाण आणून घरी कलम करत सफरचंद लागवड केली आहे. तर काश्मिरी रेड बोर, तसेच तुल डा पोलिमार्फ प्रजाती, पायनपल एमडी टू , बारामाही फळ असणारा केसर आंबा, चिकू, नारळ, खजूर, केळी, ड्रॅगन व यलो ड्रॅगन, नागपुरी संत्रा, जम्बो मोसबी, ग्रेप फ्रुट, अंजीर आदींसह विविध प्रजातीचे ४० ते ५० फळ देणारी बाग तयार केली आहे. यातून वार्षिक २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना हमखास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतीत बदल करा... 

मागील ४ वर्षापासून नोकरी सोडून शेती व्यवसाय करत असून, पारंपारिक शेतीला फाटा देवून मागील ४ वर्षापासून फळबागेची लागवड केली आहे. कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळू लागले आहे. फळबागेत आंतरपिक घेवून देखील नफा मिळवता येतो. शेतकरी बांधवांनी नव-नवीन प्रयोग करत आधुनिक शेती करावी.आणि आपल्या शेतीत बद्दल करावा असा सल्ला फळबागायतदार भरत बोलिज यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकनिफाडफलोत्पादनशेती