Join us

Farmer Success Story : दोन एकर मिरचीतुन मिळाले साडे तीन लाख रूपयांचे उत्पन्न, युवा शेतकऱ्याची कमाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:46 IST

Farmer Success Story : पाहतापाहता २१ दिवसांच्या अंतराने हिरव्या मिरचीचा तोडा केला. किलोला २० ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

भंडारा : सर्वांना रोजगाराची शास्वती देणारा शेती हाच एकमेव उद्योग जगासाठी समर्पित स ठरला आहे. शेतीकडे नकोशी म्हणून बघणाऱ्यांना पालांदूरच्या अरुण पडोळे या युवकाने शेतीत (Green Chilly crop) नवा आदर्श तयार केला आहे. गत दहा वर्षापासून मिरची उत्पादनात (Mirchi Production) त्यांचा हातखंडा आहे. दोन एकर मिरचीच्या बागेत ३.५० लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत पोहोचण्याची मनीषा अंतिम टप्प्यात आली आहे.

इतर पिकांपेक्षा वातावरणातील परिवर्तनामुळे मिरची पीक (Mirchi Crop) उत्पादित करणे कठीण होत आहे. बारीक पाखरे, फुलकिडे व चुरडा-मुरड्याच्या प्रकाराने कित्येक मिरची बागायतदार संकटात सापडले. त्यांनी अनुभवाचा आधार घेत आलेल्या किडीवर नियंत्रण मिळवीत दोन लाख रुपयांच्यावर हिरवी मिरची विकण्यात आली.

आता लाल मिरचीचा तोडाहिरव्या मिरचीचे भाव घसरल्याने अभ्यासू पडोळे यांनी लाल मिरची करण्याचा निर्णय घेतला. गत तीन दिवसांपासून लाल मिरचीचा तोडा सुरू केला आहे. अख्खा मिरचीचे बाग लालच लाल झाले आहे. पंधरा क्विंटल मिरची मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ झाली आहे.

अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही...उत्पन्नाच्या अर्धे खर्चात, तर अर्धा नफा मिरचीच्या बागेतून अरुण पडोळेला मिळणार. यात ५० मजुरांना ९ महिने काम मिळाले, हे विशेष! कमी पाण्यात व्यवस्थित नियोजन मिरची बागेचे केल्यास एकराला लाख रुपयाचा नफा शक्य आहे. - अरुण पडोळे, मिरची उत्पादक, पालांदूर.

१४० ते १५० रुपयांचा दर...लाल मिरचीच्या दरात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. मागणी लक्षात घेता, पालांदूर व परिसरात १४०-१५० रुपये दराने लाल मिरचीची विक्री सुरू आहे. आठवडाभरात सुद्धा शेतातूनच मिरचीची विक्री थेट ग्राहकांना करणार आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता, यावर्षी सुद्धा ग्राहकांचे स्थानिकच्या मिरचीला मोठी पसंती मिळत आहे. स्थानिक भंडारा व नागपूर येथे बंडू बारापात्रे यांच्या मध्यस्थीने २०-३५ रुपये दरापर्यंत हिरवी मिरची विकली. यातून २.२५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आले.

टॅग्स :मिरचीशेती क्षेत्रशेतकरी यशोगाथाशेती