नंदुरबार : तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारातील तरुण शेतकरी देवेंद्र विनोद चौधरी यांनी साडेतीन एकर क्षेत्रात 'इलायची केळी' (एलक्की) या दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या केळीच्या जातीची लागवड करून तालुक्यात पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे.
देवेंद्र चौधरी यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात केले. योग्य अंतरावर लागवड, ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर आणि रोग व्यवस्थापन यावर विशेष लक्ष देत त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने पीक घेतले. चार एकर मध्ये चार हजार झाडे सात बाय पाच अंतरावर लागवड केली असून, एका घडामध्ये ९ ते १० फण्या येत आहेत.
प्रत्येक घडाचे वजन साधारण १० किलोपर्यंत भरत आहे. सध्या बाजारात या केळीला ५५ ते ६० रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. सध्या सदर केळी ही दिल्ली येथे जात आहे. इतर केळींच्या तुलनेत हा दर अधिक आहे. सध्या केळी काढणीस सुरुवात झाली आहे. या केळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असून आरोग्यासाठीही ती गुणकारी असल्याचे शेतकरी सांगतात.
या यशस्वी प्रयोगामुळे तळोदा तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनाही नवीन पिकांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवकल्पनांची जोड दिल्यास शेतीही नक्कीच फायदेशीर ठरू शकते, हे देवेंद्र चौधरी यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
आरोग्यासाठी फायदेशीर केळी पोटॅशियमयुक्त, ऊर्जा देणारी व पचनास हितकारक येलक्की केळी ही दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे. तिचा लहान आकार, पातळ साल, सुगंधी व अतिगोड गर ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. आरोग्यदृष्ट्या ही केळी पोटॅशियमयुक्त, ऊर्जा देणारी व पचनास हितकारक असल्याने मागणी वाढत आहे.
तळोदा तालुक्यात प्रथमच प्रयोगदक्षिण भारतात या केळीला मोठ्या प्रमाणावर मागणी असून, बाजारात चांगला दर मिळतो. नंदुरबार जिल्ह्यातील सुजालपूर येथे यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर या जातीची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर तळोदा तालुक्यात प्रथमच हा प्रयोग करण्यात आला आहे.
Web Summary : Devendra Choudhary successfully cultivates cardamom bananas in Nandurbar using YouTube-learned techniques. He achieved 9-10 bunches per plant, fetching high prices in Delhi markets due to the banana's superior protein content and health benefits. This inspires other farmers in the region.
Web Summary : देवेंद्र चौधरी ने यूट्यूब से सीखी तकनीकों का उपयोग करके नंदुरबार में सफलतापूर्वक इलायची केले की खेती की। उन्होंने प्रति पौधे 9-10 गुच्छे प्राप्त किए, जो केले की बेहतर प्रोटीन सामग्री और स्वास्थ्य लाभों के कारण दिल्ली के बाजारों में ऊंची कीमतों पर बिक रहे हैं। इससे क्षेत्र के अन्य किसानों को प्रेरणा मिलती है।