Join us

'फुल' टू धमाका; ऊस शेती थांबवली... बेंगलोरहून ३६ हजार रोपं आणली... अन् 'शेवंती'ने कमाल केली!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 3:11 PM

देशमुख मळा (ता. दौंड) येथे मुबलक पाण्याचा स्रोत आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतीला उपलब्ध होते, उसाचा शाश्वत उत्पन्नाचा स्रोत सोडून पारंपरिक शेतीऐवजी शेवंतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून भरघोस फायदा मिळवला.

बापू नवलेदेशमुख मळा (ता. दौंड) येथे मुबलक पाण्याचा स्रोत आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतीला उपलब्ध होते, उसाचा शाश्वत उत्पन्नाचा स्रोत सोडून पारंपरिक शेतीऐवजी शेवंतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून भरघोस फायदा मिळवला, येथील शेखर मोरे या युवा शेतकरी पूर्वी ऊस शेती करीत असे. मात्र त्यांनी मित्राच्या सल्ल्याने त्यांनी बंगलोर येथून ३६००० रोपे विकत घेतली.

शेवंतीचा वाण भरघोस उत्पन्न देणारा आहे. येथील वातावरणाला सूट होणारी ही प्रजाती जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न देणारी ठरली. त्यातून लाखो रुपयांचा फायदा मोरे यांना मिळाला आहे. मोरे यांनी सर्वप्रथम पाण्याचा निचरा असणारी जमीन निवडली. श्रावण महिन्यात लागवड करावयाचे असल्यामुळे यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असते, जास्त पाऊस झाल्यास ही झाडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उंच बेड करावे लागतात. छोटे बेड केल्याने त्यावर पाणी साठू शकते. त्याचा फटका कोवळ्या रोपांना बसू शकतो. त्याचबरोबर या फुलशेतीला अल्प प्रमाणात पाण्याची गरज असते.

अधिक वाचा: खानापूरच्या माळावर फुलली तैवान पेरूची शेती

आवक वाढल्यास देखील मार्केट पडत नाहीठिबक सिंचनद्वारे झाडांना पाण्याची उपलब्धता करून दिली. फुल विक्रीसाठी मार्केट स्थानिक निवडण्याऐवजी त्यांनी मुंबई बाजारपेठ निवडली. येथे फुलांची जास्त आवक झाल्यास देखील मार्केट ऐवढे पडत नाही. स्थानिक मार्केटमध्ये हा धोका संभवतो, सरासरी १२० ते १४० रुपये किलो मागे दर त्यांना मिळाला. फुलांचा तोडा शनिवार ते बुधवार या दरम्यान केला जातो.

मार्गदर्शनातून मिळाला आकारमोरे आपल्या परिवारासह शेवंती फुलशेतीचे व्यवस्थापन करीत असतात, खत व्यवस्थापन व कीड नियंत्रण यासाठी वाखारी वाकडा पूल येथील बालाजी कृषी सेवा केंद्राचे संचालक राहुल देशमुख यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. मोरे यांनी यापूर्वी ऊसशेती अनेकवेळा केली. त्यात शाश्वत उत्पन्न आहे. प्रयोग म्हणून त्यांनी यावेळी शेवंती हे पीक निवडले आणि त्यांना भरपूर नफा झाला.

टॅग्स :फुलशेतीशेतकरीदौंडमुंबईबाजारशेती