Join us

ऑडीतून येऊन भाजी विकणाऱ्या शेतकऱ्यासारखी शेती तुम्हालाही करता येऊ शकते...

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 02, 2023 4:39 PM

जगभरात शहरी शेतीकडे वाढता कल

'ऑडी'सारखी प्रशस्त गाडी. या चारचाकीतून  एक लुंगी घातलेला व्यक्ती येतो. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवतो. गाडीतून मेणकापडाचा एक तुकडा जमिनीवर टाकतो. त्यावर वजनकट ठेवतो आणि शेतातून ताजी तोडून आणलेली भाजी रचून ठेवतो. येणाऱ्या गिर्हाईकांना कागदामध्ये भाजी गुंडाळून विकतो. भाजी तासाभरात संपते आणि पुन्हा हा युवा शेतकरी त्याच्या प्रशस्त गाडीत बसून घरी रवाना होतो. 

केरळ राज्यातील सुजित एस पी नावाच्या तरुण शेतकऱ्याचा हा व्हीडीओ सध्या सामाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. पण हे सांगण्यामागचे कारण काय? तर शहरी  शेतीचे वाढणारे प्रमाण आणि त्यातून येणारी शेतकऱ्यांची सधनता हे वाढती आहे. पारंपरिक शेतीला स्मार्ट क्लुप्त्या वापरून नवी दिशा देणारे शेतकरी समृद्ध होताना दिसत आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाचा शिक्षण झाले की  'आधी मिळेल ती नोकरी  आणि कालांतराने गावाकडे जाऊन शेती करू' असा दृष्टीकोन जरी एका बाजूला असला तरी दुसऱ्या बाजूला शहरी शेतीचे वाढते प्रमाण या समजाला छेद देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

पहा व्हिडीओ...

https://x.com/madhuriadnal/status/1708033671641584080?s=20

केवळ देशात नव्हे तर जगभरात शहरी शेतीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जगभरातील लोकसंख्येच्या ६८ टक्के लोक २०५० पर्यंत शहरी झाले असतील असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शिकण्याच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने गावातून शहरात जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत असले तरी शेती ही शहरी भागात, शहरी वातावरणातही केली जाऊ शकते. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडताहेत. कोणी अपार्टमेंटच्या गच्चीवर छोट्याच्या भागात मिरचीची लागवड करतोय तर कोणी बंगल्याच्या परसदारात 'आपल्याला लागेल तेवढी भाजी तरी उगवू' या उद्देशाने लागवड करताना दिसतोय. काहींनी त्याला केरळातल्या या तरुणासारखा उत्पन्नाचा स्त्रोत बनवल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

शहरी शेती म्हणजे काय? 

सध्या शब्दात शहरी शेती म्हणजे पिकांची लागवड करणे, पशुधन एकंदरीत काय तर  शहरी भागात केली जाणारी शेती . 

सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून शाश्वत अन्न उत्पादित केले जाणे आणि शहरी भागातल्या लोकांच्या अन्नाच्या गरजा पूर्ण करणे असे या शेतीचे उद्दिष्ट आहे. पर्यावरणीय बदलांमुळे 1970 नंतर एका व्यक्तीकडे असणारे जमीन क्षेत्र हे 2050 पर्यंत एक तृतीयांशाने कमी होऊ शकते असा अंदाज एमआयटी कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख दीपक बोरनारे यांनी  शहरी शेती या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत व्यक्त केला. 

 

टॅग्स :शेतीशेतकरीलागवड, मशागतपीकआॅडी