Join us

Soyabean Kadhani : लवकर पक्व होणाऱ्या सोयाबीनच्या वाणांची काढणी कधी करावी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:05 IST

Soyabean Kadhani : राज्यातील इतर जिल्ह्यातील सोयाबीन पीक पक्वतेच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे.

Soyabean Kadhani : एकीकडे मराठवाड्यातील बहुतांश भागातील सोयाबीन पिके नष्ट झाली आहेत. इतरही अनेक पिकांचे पुरात नुकसान झाले आहे. मराठवाडा वगळता राज्यातील इतर जिल्ह्यातील सोयाबीन पीक पक्वतेच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे. अशा लवकर पक्व होणाऱ्या सोयाबीनची काढणी कधी करावी, हे पाहुयात... 

लवकर पक्व होणाऱ्या वाणांची काढणी

  • सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांमध्ये ९० टक्के शेंगा पिवळ्या पडल्यावर पिकाची काढणी केली जाऊ शकते. 
  • यामुळे बियाणे अंकुरणावर विपरीत परिणाम होत नाही.
  • ज्या ठिकाणी पीक परिपक्व झाले आहे, तिथे सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या गुणवत्तेमध्ये घट येऊ शकते. 
  • शेंगांमध्ये दाणे अंकुरित होण्याचीही शक्यता असते. अशा वेळी पिकाची योग्यवेळी काढणी करावी. 
  • जेणेकरून शेंगा तडकण्यामुळे अथवा दाणे अंकुरित होण्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल
  • पीक पक्वतेनंतर पिकाची काढणी व मळणी करावी. 
  • विळ्याने कापणी करून झाडे गोळा करून, प्रखर सूर्य प्रकाशात अथवा पावसापासून सुरक्षित जागी वाळवून, मळणीसाठी खळ्यावर ढीग करून झाकून ठेवावा.
  • मळणी करताना मळणी मशीनच्या शाफ्टची गती ३०० ते ४०० आरपीएम असावी. 
  • म्हणजे सोयाबीनच्या उगवणक्षमतेवर अनिष्ट परिणाम होणार नाही.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Harvesting: When to harvest early maturing varieties for best yield.

Web Summary : Harvest early soybean varieties when 90% of pods turn yellow to avoid quality loss and germination issues. Proper harvesting and threshing techniques (300-400 RPM) are crucial for optimal yield and seed viability.
टॅग्स :सोयाबीनशेतीकाढणीशेती क्षेत्र