Join us

मोबाईलचा वापर करून शेत जमीन मोजता येईल, ते कसं, जाणून घ्या सोप्या शब्दांत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:10 IST

Shet Jamin Mojani : आपल्या हातातील मोबाईलचा वापर करून आपलं शेत कसं मोजायचं, हे समजून घेऊयात.

Shet Jamin Mojani  : आपल्या हातातील मोबाईलचा वापर करून (measure farm land using mobile phone) आपलं शेत कसं मोजायचं, हे समजून घेऊयात. जर समजा आपलं शेत आहे, जे चौकोनी आकाराचे आहे. बहुतके शेत जमीन आकार उकार फार कमी असतात.

तर उदाहरणासाठी एक शेत घेतलं. या शेताची एक बाजू ४५० फूट आहे, दुसरी ४०० फूट, तिसरी ३२० फूट आणि चौथी बाजू ३०० फूट आहे. जसं आपण मोजमाप करतो तसं मोजमाप करून घ्यायचं. 

आता या चौकोनी आकाराच्या शेत जमिनीला तुम्ही मध्यभागी रेषा (आडवी, उभी) काढायची आहे. तिचे देखील माप काढायचे आहे. हे सर्व झाल्यांनतर तुम्हाला मोबाईलचा वापर करून प्रत्यक्ष शेत जमीन किती आहे, याच उत्तर मिळणार आहे. 

 

  • सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सर्च ब्राऊझरवर जायचं आहे. 
  • या ठिकाणी प्लॉट Area Calculator असे सर्च करायचे आहे. 
  • सुरवातीला या संदर्भातील एक वेबसाईट दिसून येईल. 
  • यावर क्लिक करून पुढील विंडोमध्ये मोजमापाची माहिती दिसेल. 
  • तर आपण आपली जमीन वरीलप्रमाणे मोजून घेतलेली आहे.  (जसे चार बाजूंचे माप, यानुसार)
  • Area Of Triangale या पर्यायाखालील विंडोमध्ये वरील मोजमापाची माहिती भरायची आहे. 
  • आपण फूट निहाय मोजले असल्याने ते select करून घ्यावे, त्यांनतर चारी बाजूंचे मापे टाकावीत. 
  • हे सगळं तंतोतंत भरल्यानंतर Calculate Area या पर्यायावर क्लिक करा. 
  • यानंतर आपल्यासमोर आपल्या जमिनीची संपूर्ण माहिती दिसेल. 
  • जमीन किती फूट आहे, किंवा मीटर आहे किंवा एकर आहे. अशी सगळी माहिती दिसून येईल.  
English
हिंदी सारांश
Web Title : Measure farm land using mobile: Simple steps explained.

Web Summary : Easily measure your farm land using a mobile app! Input the dimensions of your land's sides and diagonals into a plot area calculator online to determine its area in feet, meters, or acres.
टॅग्स :जमीन खरेदीशेती क्षेत्रशेती