Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mango Harvesting : आंबा अधिक काळ टिकवण्यासाठी काढणी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:10 IST

Mango Harvesting : आंबा फळ काढणीचे नियोजन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते जाणून घेऊयात... 

Amba Kadhani : आंबा फळ काढणी ही योग्य वेळी (फुलोऱ्यापासून १२०-१४० दिवस) आणि योग्य पद्धतीने करणे, फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. फळ काढणीचे नियोजन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते जाणून घेऊयात... 

फळ काढणीचे नियोजन

  • आंब्याच्या विविध जातींना बाजारात त्यांच्या गुणधर्मामुळे मागणी असते. 
  • अवीट गोडीचा हापूस खाण्यासाठी, लोणच्यासाठी, रसासाठी व परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी फेब्रुवारी ते जून या कालावधीत उपलब्ध होतो. 
  • एप्रिल महिन्यापासून गोड केसर, रसाळ पायरी याच बरोबर तोतापुरी, नीलम, आम्रपाली, दशहरी हे आंबेदेखील उपलब्ध होणे सुरू होते. 
  • हापूसपासून विकसित संकरित रत्ना, सिंधू, सुवर्णा, सोनपरी या जातींना देखील बाजारात वाढती मागणी आहे.
  • आंबा अधिक काळ टिकवण्यासाठी तो वेळेवर काढणे आवश्यक आहे. 
  • वातावरणाचा आंब्याच्या पक्वतेवर परिणाम होताना आढळतो. 
  • कातळावरून परिवर्तित होऊन उष्णता वाढल्यामुळे समुद्रकिनारी आंबा ९० ते १०० दिवस तर अंतर्गत भागात १२५ ते १३५ दिवस तयार होण्यासाठी घेतो. 
  • आंब्याला मोहोर टप्प्याटप्प्यात आल्यास तीन ते चारवेळा काढणी करणे आवश्यक आहे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Harvesting Mangoes: Key things to remember for longer shelf life.

Web Summary : Proper mango harvesting at the right time is crucial for quality. Market demand varies by variety. Coastal mangoes mature faster (90-100 days) than inland (125-135 days). Staggered flowering requires multiple harvests.
टॅग्स :आंबाकाढणीफलोत्पादनशेती क्षेत्र