Jamin Kharedi : आज-काल ग्रामपंचायत (Grampanchayat) हद्द आणि शहर हद्द हे लक्षात येत नसल्यामुळे अनेक सदस्यांची प्लॉट खरेदी करत असताना फसवणूक होताना दिसून येत आहे. याबाबतीत फसवणूक होऊ नये, म्हणून आपण आपल्या संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्याशी संपर्क साधूनच सदर जमिनीचे खरेदीखत करायला हवे. या भागातून ग्रामपंचायत हद्दीतील घर याबाबतीत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत....
आपण ज्यावेळी प्रॉपर्टी खरेदी (Land Buying) करत असतो, त्यावेळेस आपल्या फक्त डोक्यात एकच असते कि, सदर मिळकत ही एन ए असावी. जेणेकरून आपल्याला बांधकाम करणे सोयीस्कर जाईल. परंतु प्रॉपर्टी फक्त एन ए असून जमत नाही. तर एन ए प्रॉपर्टीवर (NA Property) बांधकाम करताना देखील आपल्याला आपल्या संबंधित विभागाकडून बांधकामाची परवानगी (Construction Permit) घ्यावे लागते. आणि त्यासाठी आपल्याला आपले ग्रामपंचायतीमधून "बांधकामाचा परवाना" घ्यावा लागतो.
आपल्या बांधकामाचे डिझाईन या आर्किटेककडून तयार करून घ्यावे लागतात. त्यानंतर आपण दोन प्रकारचे परवानगी मिळवू शकतो. त्या म्हणजे एक GP अर्थात ग्रामपंचायत परवानगी. आपल्याला ग्रामपंचायत हद्दीत दोन पर्याय उपलब्ध असतात. ग्रामपंचायत भागात ज्यावेळेस आपण GP करून घेत असतो. त्यावेळेस आपल्याला मिळालेले परवानगीमध्ये बांधकाम करण्याचं जे काही क्षेत्र असतं. त्यामध्ये आपण जवळपास तीन पट बांधकाम करू शकतो.
म्हणून जमीन ग्रामपंचायत हद्दीत... उदाहरणार्थ ग्रामपंचायत हद्दीत दहा गुंठे जमीन आहे, त्याचा अंदाजे आपण एक गुंठा हजार चौरस फूट त्याप्रमाणे दहा हजार चौरस फूट जमीन असेल तर या भूखंडावर जास्तीत जास्त आठ हजार चौरस फूट बांधकाम करता येते, पण जर परवानगी घेतली असेल तर याच भूखंडात 23 हजार चौरस फूट बांधकाम करण्यास ही परवानगी मिळते. म्हणून याचा फायदा अनेक बिल्डर आपल्या या जमिनी ग्रामपंचायत हद्दीत असल्याचा दाखवून अनेकांना गंडा घालण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली प्रॉपर्टी हे ग्रामपंचायत हद्दीत आहे किंवा शहरी भागात आहे हे तपासले पाहिजे.
- अॅडव्होकेट मयूर कारभारी वाखुरे, जिल्हा व सत्र न्यायालय, नेवासा, अहिल्यानगर